सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा पासवर्ड का बदलला ? पुण्यात माजी झेडपी सदस्य भावाच्या जीवावर उठला

pune-पुण्यातील लोणीकंद येथे ही घडना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हाही नोंदविण्यात आला आहे.

  • Written By: Published:
Pune Crime

पुणे : अभियांत्रिकी महाविद्यालयातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा पासवर्ड का बदलला असे विचारल्यामुळे लहान भावाने मुलासह मोठ्या भावाला मारहाण केली आहे. पुण्यातील लोणीकंद येथे ही घडना घडली आहे. या प्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हाही नोंदविण्यात आला आहे. (pune-lonikand-brother-beaten-up-by-former-zp-member-in-pune)

शंकर रामचंद्र भूमकर ( वय 58) व त्यांचा मुलगा सिद्धांत ( वय 25 दोघेही रा. लोणीकंद ) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांचे मोठे भाऊ उद्धव रामचंद्र भूमकर ( वय 65, रा. लोणीकंद ) यांनी फिर्याद दिली. भूमकर कुटुंबीयांचे रामचंद्र एज्युकेशन सोसायटीचे रामचंद्र कॉलेज ऑफ इंजिनियरिंग हे महाविद्यालय आहे. उद्धव भूमकर हे त्या संस्थेचे खजिनदार आहेत. तर शंकर भूमकर हे संचालक असून, ते माजी जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आहे.


वादामागे कॉलेजच्या व्यवहाराचे कारण ?

बकोरी रोडवर हे महाविद्यालय आहे. या महाविद्यालयातील सीसीटीव्हीचा पासवर्ड सिद्धांत याने बदलला. तसेच सर्व आर्थिक व्यवहार शंकर व त्यांचा मुलगा बघतात. त्याबाबत उद्धव यांना काही कळू देत नाहीत. त्याबाबत विचारणा केली की दोघे शिवीगाळ करायचे. कॉलेजच्या काही महत्वाच्या फाईल जागी दिसल्या नाही. लोणीकंद येथील घरी उध्दव यांनी पासवर्ड व फाईल बद्दल शंकर यांना विचारले आहे.

दोघा बाप-लेकांनी उद्धव यांना तू आम्हाला विचारणारा कोण म्हणून शिवीगाळ करीत आधी लाथाबुक्याने मारहाण केली. नंतर कोणत्या तरी कठीण वस्तुने खाली पाडून मारहाण केली. उद्धव यांच्या पुतण्याने व पत्नीने त्यांची सोडवणूक केली. लोणीकंद पोलिसात त्यांनी दोघांविरोधात फिर्याद दिली. पुढील तपास लोणीकंद पोलिस करीत आहेत.

follow us