न्यूझीलंडला धक्का! दुसऱ्या वनडेआधी नववा खेळाडूही आऊट; पाकिस्तानला विजयाची संधी

न्यूझीलंडला धक्का! दुसऱ्या वनडेआधी नववा खेळाडूही आऊट; पाकिस्तानला विजयाची संधी

PAK vs NZ : पाकिस्तानचा संघ न्यूझीलंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात पाकिस्तानी टीम (PAK vs NZ) कमालाची अपयशी ठरली आहे. टी 20 मालिकेत 1-4 अशा फरकाने पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर वनडेतही पाकिस्तान 1-0 अशा फरकाने पिछाडीवर पडला आहे. आता दुसरा एकदिवसीय सामना होणार आहे. या सामन्यातून कमबॅक करण्याची संधी मिळाली आहे. न्यूझीलंडच्या संघातून आता नववा खेळाडूही बाहेर पडला आहे. नऊ मोठे खेळाडू संघात नाहीत म्हणून पाकिस्तानला हा सामना जिंकण्याची नामी संधी चालून आली आहे.

मार्क चॅपमॅन हा खेळाडू दुसऱ्या वनडे सामन्यात न्यूझीलंडच्या संघात दिसणार नाही. पहिल्या वनडेत याच चॅपमॅनने जबरदस्त कामगिरी केली होती. त्याच्या कामगिरीच्या बळावरच न्यूझीलंडला हा सामना जिंकता आला होता. या सामन्यात त्याने 132 धावा केल्या. परंतु, आता हॅमस्ट्रिंग इंजरीमुळे त्याला दुसऱ्या वनडेत खेळता येणार नाही. पहिल्या सामन्यात फिल्डिंग करताना त्याला दुखापत झाली होती.

पाकिस्तानला पुन्हा धक्का, पहिल्या एकदिवसीय सामन्यात न्यूझीलंडचा शानदार विजय

मार्क चॅपमॅन व्यतिरिक्त केन विलियमसन, रचिन रवींद्र, ट्रेंट बोल्ट, मिचेल सँटनर, डेवन कॉनवे, ग्लेन फिलीप्स, लॉकी फर्ग्युसन आणि मॅट हेनरी हे खेळाडू संघाबाहेर आहेत. याती काही खेळाडू सध्या भारतात आयपीएलमध्ये खेळत आहेत. काही जण कमेंट्री करून पैसे कमावत आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत न्यूझीलंडचा संघ नवखा दिसत आहे. अनुभवी आणि अष्टपैलू खेळाडूंची कमतरता आहे. त्यामुळे न्यूझीलंडला पराभूत करण्याची संधी पाकिस्तानकडे आहे.

बुधवारी होणार दुसरा सामना

पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यात एकदिवसीय मालिका होत आहे. या मालिकेत एकूण तीन सामने आहेत. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने विजय मिळवत आघाडी घेतली आहे. आता दुसरा सामना जिंकून याही मालिकेत विजय मिळवण्याचा न्यूझीलंडचा प्रयत्न आहे. दुसरीकडे स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवण्यासाठी दुसरा सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकणे हाच पर्याय पाकिस्तानसमोर आहे. दुसरा एकदिवसीय सामना बुधवारी हॅमिल्टन येथे होणार आहे.

New Zealand VS Pakistan: पाक संघ पुन्हा तोंडावर आपटला ! टी-20 मालिका न्यूझीलंडने सहज जिंकली

follow us
  • fb
  • instagram
  • youtube