New Zealand VS Pakistan: पाक संघ पुन्हा तोंडावर आपटला ! टी-20 मालिका न्यूझीलंडने सहज जिंकली

  • Written By: Published:
New Zealand VS Pakistan: पाक संघ पुन्हा तोंडावर आपटला ! टी-20 मालिका न्यूझीलंडने सहज जिंकली

New Zealand Beat Pakistan T20 Series won : चॅम्पियन्स ट्रॉफीमधील (Champions Trophy) मध्ये अत्यंत लाजिरवाणे प्रदर्शन झालेल्या पाकिस्तान संघावर आता टी-20 मालिकेतही पराभवाची नामुष्की आली आहे. पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील तीन सामन्यात न्यूझीलंडने (New Zealand) पाकिस्तानला (Pakistan)पराभूत करत मालिकेवर कब्जा केलाय. विशेष न्यूझीलंड संघातील टॉप खेळाडूही हे भारतात आयपीएल खेळत आहे. तरीही न्यूझीलंडच्या संघाने पाकला धूळ चारली.

न्यूझीलंडचे दिग्गज खेळाडू केन विलियम्सन, मिचेल सेंटनर, ट्रेंट बोल्ट, रचिन रवींद्र, ड्वेन कॉन्‍वे, लॉकी फर्ग्यूसन, ग्‍लेन फिलिप्‍स, मॅट हेन्री, टॉम लाथम आणि विल यंग हे आयपीएलमध्ये खेळत आहेत. त्यामुळे न्यूझीलंडचे कर्णधारपद मायकल ब्रेसवेलकडे आहे. पाकिस्तान संघ हा न्यूझीलंडच्या दौऱ्यावर आहे.

‘आमच्याकडे बोट केलं की, आम्ही दांडूक काढणार!’ प्रताप चिखलीकरांनी अजितदादांसमोरच अशोक चव्हाणांना दम भरला

आज झालेल्या चौथ्या सामन्यात न्यूझीलंडने पाकिस्ताचा 115 धावांची मोठा पराभव केला. प्रथम फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडने 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्सच्या बदल्यात 220 धावसंख्या उभारली. टीम सीफर्टने 22 चेंडूत 44 आणि फिन एलनने 20 चेंडूत 50 धावा करत अर्धशतक झळकविले. कर्णधार ब्रेसवेलनेही तुफानी फटकेबाजी केली. त्याने 26 चेंडूत 46 धावांत नाबाद खेळी केली.

जयंत पाटील अन् अजित पवारांच्या भेटीवरून भुजबळांचा सवाल; म्हणाले, आम्ही शत्रू… काय बिघडलं?


पाकिस्तान 105 धावांवर ऑल आऊट

प्रत्युत्तर पाक संघ 16.3 ओव्हरमध्ये 105 धावांवर ऑल आऊट झाला. अब्दुल समदने सर्वाधिक 44 धावा केल्या. तर इरफान खानने 24 धावा केल्या. पाकचे इतर फलंदाज न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकले नाहीत. जॅकब डफीने चार विकेट्स घेत पाकचे कंबरडे मोडले. तर जॅक फाउलकेसने तीन, विलियम ओरुर्के, जेम्स नीशम, ईश सोढीने प्रत्येकी एक-एक विकेट घेतल्या.


पाकचा केवळ एक विजय

न्यूझीलंडने पहिला सामना 9 विकेट्स आणि दुसरा सामना 5 विकेट्स जिंकला. तिसऱ्या सामन्यात पाकिस्तानच्या खेळाडूंनी कमबॅक करत न्यूझीलंडचा 9 विकेट्सने पराभव केला. त्यामुळे रविवारचा चौथा सामना जिंकून पाक मालिकेत बरोबरी साधेल असे वाटत होते. परंतु न्यूझीलंडसमोर गोलंदाज आणि फलंदाजांनी नांग्या टाकल्या. आता येत्या बुधवारी पाचवा सामना खेळविला जाणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube