India VS New Zealand : न्यूझीलंड कुलदीप, वरुणच्या ‘जाळ्यात’ अडकले ! अर्धासंघ पावणेदोनशे धावांत बाद

  • Written By: Published:
India VS New Zealand : न्यूझीलंड कुलदीप, वरुणच्या ‘जाळ्यात’ अडकले ! अर्धासंघ पावणेदोनशे धावांत बाद

Champions Trophy Final : चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये (Champions Trophy Final) भारतीय (India) फिरकी गोलंदाजांच्या जाळ्यात न्यूझीलंडचे फलंदाज अडकले. चांगली सुरुवात करणाऱ्या न्यूझीलंडला फिरकी गोलंदाजांनी एकामागून एक झटके दिले. न्यूझीलंडचा (New Zealand) अर्धासंघ 165 धावांत बाद झाला. फिरकीच्या जोरावर भारताने सामन्यावर पकड निर्माण केली आहे. 41 ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या 174 धावा झाल्या आहेत. डिरेल मिचेल हा एका बाजूने डाव सांभाळत असून, त्याने अर्धशतक झळकविले. भारताकडून वरुण चक्रवर्ती आणि कुलदीप यादवने प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या आहेत.

न्यूझीलंडने नाणेफेक जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर विल यंग आणि रचिन रवींद्रने सावध सुरूवात केली. चांगली सुरुवात झाल्यानंतर त्यांनी फटकेबाजी सुरू केली. पहिल्या तीन ओव्हरमध्ये न्यूझीलंडच्या अवघ्या दहा धावा झाल्या होत्या. परंतु चौथ्या ओव्हरमध्ये रचिन रविंद्रने हार्दिक पंड्याची जोरदार धुलाई केली. पंड्याची ओव्हरमध्ये रचिनने एक षटकार आणि दोन चौकार मारले. पंड्याने एका ओव्हरमध्ये 16 धावा दिल्या. सातव्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडने बिनबाद 51 धावा केल्या. त्याच दरम्यान मोहम्मद शमीने आपल्याच गोलंदाजीवर रचिन रविंद्रचा झेल सोडला. तर आठव्या ओव्हरमध्ये रचिन रवींद्र हा वरुण चक्रवर्तीचा चेंडूवर बाद झाला. परंतु डीआरएसमध्ये तो बाद नव्हता. त्यानंतर दुसऱ्याच चेंडूवर रचिनला जीवनदान मिळाले. श्रेयर अय्यरने झेल सोडला. भारताच्या सुमार क्षेत्ररक्षणामुळे न्यूझीलंडच्या चांगल्या धावा होत होत्या. परंतु त्याच ओव्हरच्या पाचव्या चेंडूवर वरुण चक्रवर्तीच्या फिरकीत यंग अडकला. यंग एलबीडब्लू झाला. त्याने 15 धावा केल्या. 57 धावांवर न्यूझीलंडची एक विकेट गेली होती. त्यानंतर मात्र न्यूझीलंडचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकाव धरू शकले नाहीत.

रचिन रवींद्रला 37 धावांवर कुलदीप यादवने क्लिनबोल्ड केले. त्यानंतर केन विल्यमसनचा मोठा अडथळा कुलदीपने दूर केला. विल्यमसनने 11 धावांवर बाद झाला. त्यानंतर डारेल मिचेल आणि टॉम लॅथमने एक छोटी भागीदारी करत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. परंतु टॉमला रवींद्र जडेजाने एलबीडब्लू करत भारताला चौथी विकेट मिळवून दिली. एका बाजूने डॅरेल मिचने डाव सांभाळला. त्याला ग्लेन फिलिप्स हा साथ देत होता. पण वरुणने फिलिप्सला बाद करत न्यूझीलंडला पाचवा झटका दिला. न्यूझीलंडच्या पाच विकेट्स 165 धावांवर गेल्या. भारताकडून वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव या दोघांनी दोन विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजाने एक विकेट घेतली. 40 व्या ओव्हरमध्ये न्यूझीलंडने पाच विकेट्सच्या बदल्यात 172 धावा केल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube