Champions Trophy 2025 : भारताचे न्यूझीलंडसमोर 250 धावांचे लक्ष्य, श्रेय्यर अय्यर आणि हार्दिक पंड्याने सावरले !

India vs New Zealand: चॅम्पियन्स ट्रॉफीच्या (Champions Trophy 2025) शेवटच्या साखळी सामन्यात न्यूझीलंडच्या (New Zealand) गोलंदाजांनी भारतीय संघाचे (India) नऊ फलंदाज बाद करत 249 धावांवर रोखले. भारतीय संघाची सुरुवातीपासून पडझड झाली. श्रेयस अय्यरच्या 79, अक्षर पटेलच्या 42 आणि हार्दिक पंड्याच्या 45 धावांमुळे भारतीय संघ सावरू शकला आहे. न्यूझीलंडच्या मॅट हेन्ररीने पाच विकेट्स घेतल्या.
न्यूझीलंडने नाणेफक जिंकत भारताला फलंदाजीला आमंत्रित केले. परंतु भारतीय संघाची सुरुवात एकदम खराब झाले. सलामीचे तिन्ही फलंदाज झटपट बाद झाले. त्यानंतर श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने 98 धावांची भागिदारी करत डाव सावरला आहे. हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा (16 धावा) या जोडीने न्यूझीलंड गोलंदाजांचा सामना केला. सलामीवीर व कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल हे अपयशी ठरले. शुभनल गिल हा दोन धावांवर बाद झाला. तर रोहित शर्मा हा 15 धावांवर झाला. 300 वा एकदिवस सामना खेळत असलेला विराट कोहली हा 11 धावांवर तंबूत परतला. कोहलीचा एक शानदार फटका खेळला. परंतु ग्लेन फिलिप्सने हवेत उडी घेत एका हाताने शानदार झेल पकडला.
A late surge from Hardik Pandya powered India after New Zealand’s excellence in the field 👊#ChampionsTrophy #NZvIND ✍️: https://t.co/F2UBD2cv49 pic.twitter.com/TIZjvw3Znn
— ICC (@ICC) March 2, 2025
भारतीय संघाचे तीन फलंदाज अवघ्या 30 धावांवर बाद झाले. त्यामुळे भारतीय संघ संकटात सापडला होता. परंतु श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी चौथ्या विकेट्ससाठी 98 धावांची भागिदारी केली. त्यामुळे संघाची धावसंख्या 128 पर्यंत गेली होती. विलियमस ओरुर्केने अक्षर पटेलने बाद केले. पटेलने 61 चेंडूत 42 धावा केल्या.
विदर्भाने 7 वर्षांनंतर जिंकली रणजी ट्रॉफी, अंतिम सामन्यात केरळचा पराभव
श्रेयस अय्यरने अर्धशतक झळकविले. त्यानंतर तो 79 धावांवर त्याला ओरुर्केने बाद झाले. अय्यरने 98 चेंडूंत 4 चौकार आणि दोन षटकार मारले. केएल राहुलने 23 आणि रविंद्र जडेजा 16 धावांवर बाद केले. हार्दिक पंड्याने शेवटच्या षटकात बाद झाला. त्याने 45 चेंडूंत 45 धावांची खेळी केली. त्यात चार चौकार आणि दोन षटकार हार्दिकने मारल्या. मोहम्मद शमीने पाच धावा केल्या.