Champions Trophy 2025: भारताचा पाकिस्तानवर ‘विराट’ विजय; कोहलीची बॅट तळपली, जबरदस्त शतक ठोकले!

  • Written By: Published:
VIRAT Kohli India Beat Pak

Champions Trophy 2025, India beat Pakistan : चॅम्पियन ट्रॉफीच्या (Champions Trophy 2025) पाचव्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा सहा विकेट्सने पराभव करत दणदणीत विजय मिळविला. भारतीय गोलंदाजांच्या शानदार कामगिरीनंतर फलंदाजांनाही जबरदस्त कामगिरी केली. विराट कोहलीने चौकार मारत शतक झळकत टीम इंडियाला विजयही मिळवून दिला आहे. 242 धावांचे लक्ष्य भारताने 43 व्या षटकांत गाठले.

सलामीवीर व कर्णधार रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी चांगली सुरुवात करून दिली. रोहित शर्मा 20 धावांवर बाद झाला. त्यानंतर विराट कोहली व गिलने दुसऱ्या विकेटसाठी 69 धावांची भागिदारी केली. शुभमन गिल बाद झाल्यानंतर श्रेयस अय्यर आणि विराटने 114 धावांची तिसऱ्या विकेट्साठी भागिदारी केली. या भागिदारीमुळे भारत सहज विजयाकडे गेला. हार्दिक पंड्याच्या रुपात भारताला चौथा झटका बसला. पण त्यानंतर विराटने फटकेबाजी करत विजय मिळवून दिला. कोहलीने 111 चेंडूत शतक झळकविले आहे. या खेळीत त्याने सात चौकार खेचले.

भारतीय गोलंदाजांसमोर पाक फलंदाजांनी नांग्या टाकल्या
प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने भारतासमोर 242 धावांचे आव्हान ठेवले होते. कर्णधार मोहम्मद रिजवान आणि रउफ यांनी डाव सावरला होता. यानंतर दोघे आऊट झाले आणि पाकिस्तानचा डाव गडगडला. शेवटच्या ओव्हरमध्ये धावांचा वेग वाढला होता. तळाच्या फलंदाजांनी धावा केल्याने पाकिस्तानला 241 धावांचे आव्हान उभे करता आले. भारतीय गोलंदाजीत अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा आणि हार्दिक पांड्या यांनी विकेट घेत धावसंख्येला ब्रेक लावला. त्यामुळे पाकिस्तानी फलंदाजांना पूर्ण 50 ओव्हर्सही खेळता आल्या नाहीत. 49.4 ओव्हर्समध्ये 241 धावा करता आल्या.

पाकिस्तानसाठी हा सामना करो या मरोचा आहे. कारण पहिल्या सामन्यात पराभव झाला आहे. त्यामुळे भारता विरुद्धचा सामना जिंकणे पाकिस्तानसाठी अतिशय महत्वाचे आहे. त्यामुळे या सामन्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंनी जोरदार तयारी केली होती. या सामन्यात पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इमाम उल हक आणि बाबर आझम सलामीला आले आहे. परंतु दोघेही पाकला चांगली सुरुवात करून देऊ शकले नाहीत. त्यानंतर कर्णधार रिजवान आणि सउद शकील या दोघांनी डाव सावरला. रिजवानने 77 चेंडूत 46 तर सउदने 76 चेंडूत 62 धावा केल्या. या दोघांच्या भागीदारीने डाव सावरला गेला. भारताला दोघांची भागीदारी तोडणे आवश्यक होते.

https://x.com/ICC/status/1893706160055759348

फिरकी गोलंदाज अक्षर पटेलच्या एका चेंडूवर रिजवान बाद झाला आणि ही भागीदारी तोडण्यात टीम इंडियाला यश मिळाले. 151 धावा झालेल्या असताना रिजवान बाद झाला. यानंतर 35 व्या ओव्हरमध्ये हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर सउद शकीलही तंबूत परतला. अक्षर पटेलने झेल घेत सउदला तंबूत धाडले. यानंतर मात्र पाकिस्तानचे बाकीचे फलंदाज खेळपट्टीवर फार काळ टिकू शकले नाहीत. शेवटच्या पाच ते सहा ओव्हर्समध्ये धावांचा वेग वाढला होता. परंतु, विकेटही पडत होत्या. भारताकडून कुलदीप यादवने तीन, तर हार्दिक पंड्याने दोन बळी घेतले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube