एकदिवसीय विश्वचषक वेळापत्रक जाहीर, जाणून घ्या भारतीय संघ कधी आणि कुठे खेळणार
Women ODI World Cup 2025 : पुढील महिन्यापासून महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (Women ODI World Cup 2025) सुरुवात होणार

Women ODI World Cup 2025 : पुढील महिन्यापासून महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेची (Women ODI World Cup 2025) सुरुवात होणार असून या स्पर्धेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहे. 30 सप्टेंबरपासून सुरु होणारी ही स्पर्धा भारत आणि श्रीलंकेतील 5 मैदानांवर होणार आहे. 30 सप्टेंबर रोजी या स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका (INDvsSL) यांच्यात होणार आहे. आयसीसीकडून (ICC) देण्यात आलेल्या माहितीनुसार, विश्वचषक स्पर्धेत एकूण 31 सामने होणार असून त्यापैकी 28 लीग सामने असणार आहे. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या भारतीय संघाला हा विश्वचषक जिंकण्याची सुवर्णसंधी असणार आहे. जाणून घ्या भारताचे सामने कधी आणि कुठे खेळले जाणार आहे.
भारताचे विश्वचषक वेळापत्रक
भारतीय संघ 30 सप्टेंबर रोजी श्रीलंकेविरुद्धच्या सामन्याने आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. तर दुसरा सामना 5 ऑक्टोबर रोजी पाकिस्तानविरुद्ध असेल आणि त्यानंतर तिसरा सामना 9 ऑक्टोबर रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध असेल. 12 ऑक्टोबर रोजी भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होणार आहे. तर 19 ऑक्टोबर रोजी इंग्लंडशी सामना करावा लागेल. भारत विरुद्ध न्यूझीलंड सामना 23 ऑक्टोबर रोजी होईल आणि भारतीय संघ शेवटचा लीग सामना 26 ऑक्टोबर रोजी बांगलादेशविरुद्ध खेळणार आहे.
तर दुसरीकडे उपांत्य सामन्यांचे वेळापत्रक उपांत्य फेरीतील संघांवर आधारित असेल. पहिला उपांत्य सामना गुवाहाटी किंवा कोलंबो येथे खेळवला जाईल. तर दुसरा उपांत्य सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. तर अंतिम सामना बेंगळुरू किंवा कोलंबो येथे होणार आहे.
महिला एकदिवसीय विश्वचषक 2025 भारताचे सामने
30 सप्टेंबर – भारत विरुद्ध श्रीलंका
5 ऑक्टोबर – भारत विरुद्ध पाकिस्तान
9 ऑक्टोबर – भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका
12 ऑक्टोबर – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया
19 ऑक्टोबर – भारत विरुद्ध इंग्लंड
23 ऑक्टोबर – भारत विरुद्ध न्यूझीलंड
26 ऑक्टोबर – भारत विरुद्ध बांगलादेश
‘वॉर 2 हा प्रत्येकासाठी चुकवू नये असा प्रोजेक्ट; हृतिक रोशनचा आपल्या चित्रपटावर विश्वास