‘वॉर 2 हा प्रत्येकासाठी चुकवू नये असा प्रोजेक्ट; हृतिक रोशनचा आपल्या चित्रपटावर विश्वास

‘वॉर 2 हा प्रत्येकासाठी चुकवू नये असा प्रोजेक्ट; हृतिक रोशनचा आपल्या चित्रपटावर विश्वास

War 2 : बॉलिवूड सुपरस्टार हृतिक रोशन याला विश्वास आहे की त्याचा आगामी चित्रपट ‘वॉर 2’, (War 2) जो 14 ऑगस्ट रोजी जगभर प्रदर्शित होणार आहे, प्रेक्षकांसाठी थिएटरमध्ये पाहण्यासारखा अनमिसेबल प्रोजेक्ट ठरणार आहे. या चित्रपटात हृतिक (Hrithik Roshan) , पॅन-इंडियन सुपरस्टार ज्युनियर एनटीआर (Jr. NTR) विरुद्ध एका नो-होल्ड्स-बार्ड, रक्तरंजित लढाईत भिडणार आहे, ज्याला तो मोठ्या पडद्यावरील एक भव्य व्हिज्युअल अनुभव मानतो.

हृतिक म्हणाला, “‘वॉर’ मध्ये कबीरची भूमिका करताना मला जे प्रेम आणि कौतुक मिळाले, त्याने मला ‘कहो ना… प्यार है’, ‘धूम 2’ आणि ‘कृष’च्या काळातील प्रेमाची आठवण करून दिली. यावेळी मी पुन्हा कबीर म्हणून परत आलो आहे, आणि ही भूमिका करणे माझ्यासाठी आनंदाची गोष्ट आहे कारण प्रेक्षकांनी हा कॅरेक्टर खूप आवडला होता. या वेळी तो आधीपेक्षा अधिक इंटेन्स आणि द्विधा मनस्थितीत आहे. खूप भावनिक. मला वाटते ‘वॉर 2’ हा असा चित्रपट असेल जो चुकवता कामा नये.” हृतिक, ज्याने गंभीर दुखापतींवर मात करून हा चित्रपट पूर्ण केला, सांगतो की या प्रोजेक्टसाठी सहन केलेला प्रत्येक त्रास आणि वेदना योग्य ठरल्या.

शेतकऱ्यांसाठी खासदार लंके ॲक्शन मोडमध्ये, कांद्यांच्या माळा गळ्यात घालत संसदेत घेतली एन्ट्री 

तो म्हणाला, “हे कठीण होते (वेदना आणि दुखापतींवर मात करणे). आम्ही खूप मेहनत घेतली. ‘वॉर 2’ च्या शूटिंगदरम्यान आलेल्या सर्व वेदना, सर्व दुखापती या सगळ्या त्याच्यासाठीच होत्या. कधी सेटवर वेदना होत होत्या तेव्हा मी विचार करायचो हे सगळं खरंच वर्थ आहे का? पण आता जेव्हा प्रेक्षकांचं प्रेम पाहतो, तेव्हा उत्तर आहे हो, नक्कीच.” ‘वॉर 2’ हा प्रतिष्ठित वायआरएफ स्पाय युनिव्हर्सचा सहावा चित्रपट आहे, ज्याने आतापर्यंत केवळ ब्लॉकबस्टरच दिल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube