War 2 ची तुफान क्रेझ; भारतात 4 दिवसांत गाठला 187 कोटींचा गल्ला

War 2 ची तुफान क्रेझ; भारतात 4 दिवसांत गाठला 187 कोटींचा गल्ला

War 2 Collection : बॉलीवूड सुपरस्टार हृतिक रोशन (Hrithik Roshan), ज्युनियर एनटीआर (JR. NTR) आणि अभिनेत्री कियारा अडवाणी (Kiara Advani) यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘वॉर 2’ (WAR 2) सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 14 ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाने चौथ्या दिवशी भारतात मोठी कामाई केली आहे. तर दुसरीकडे जगभरात देखील या चित्रपटाची तुफान क्रेझ पाहायला मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत या चित्रपटाने भारतात 4 दिवसांत 187 कोटींची कमाई केली आहे. तर जगभरात कमाई 215 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

हृतिक रोशन आणि ज्युनियर एनटीआर सोबत या चित्रपटात कियारा अडवाणी, आशुतोष राणा आणि अनिल कपूर आहे. हृतिकने पुन्हा एकदा कबीरची भूमिका साकारली आहे. ही भूमिका त्याने वॉरमध्ये साकारली होती. तर एनटीआर खलनायकाच्या भूमिकेत दिसत आहे. दोघांची जोडी पाहण्यासाठी चाहते थिएटरमध्ये येत आहेत. याशिवाय, कियाराच्या एन्ट्रीमुळे चित्रपट अधिक खास बनला आहे. अयान मुखर्जीच्या अद्भुत अ‍ॅक्शन सीन्स, भव्य सीन्स आणि स्टायलिश दिग्दर्शनामुळे हा चित्रपट थिएटरमध्ये वर्चस्व गाजवत आहे. ‘वॉर 2’ ने भारतात 187 कोटींची कमाई केली, ज्यामध्ये हिंदीतून 130 कोटी आणि तेलुगूतून 57 कोटींची कमाई झाली. त्यामुळे 4 दिवसांनंतर भारतात एकूण 288 कोटींची कमाई झाली आहे.

चिकन, मटण अन् माजी आमदार फारुख शाह यांना टोला; धुळ्यात इम्तियाज जलील यांनी सभा गाजवली

वॉर 2 कमाई

गुरुवार
हिंदी – 29.00 कोटी

तेलुगू- 25.00 कोटी

एकूण – 54.00 कोटी

शुक्रवार
हिंदी – 46.00कोटी

तेलुगू – 15.00 कोटी

एकूण – 61.00 कोटी

शनिवार
हिंदी – 27.00 कोटी

तेलुगू – 9.00 कोटी

एकूण – 36.00 कोटी

रविवार
हिंदी – 28.00 कोटी
तेलुगू – 8.00 कोटी

एकूण – 34.00 कोटी

एकूण
हिंदी – 130.00 कोटी

तेलुगू – 57.00कोटी

एकूण – 187.00 कोटी

follow us
  • fb
  • instagram
  • youtube