‘वॉर 2 भन्नाट असणार… तुम्ही ही क्रेझी धमाल पाहणार!’ : एनटीआर ॲक्शन स्पेक्टॅकल्ससाठी उत्सुक

‘War 2 will be amazing… you will see this crazy action!’: NTR excited to present this action spectacle to the audience : मॅन ऑफ़ द मासेस म्हणून ओळखला जाणारा एनटीआर, 14 ऑगस्ट रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या वॉर 2 ची आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात एनटीआरचा सामना होणार आहे ऋतिक रोशनशी — एक नो-होल्ड्स-बार्ड, थरारक आणि रक्तरंजित भिडंत! एनटीआरच्या मते, प्रेक्षकांना लवकरच थिएटरमध्ये वॉर 2 चं खरं वेड पाहायला मिळणार आहे.
मोठी बातमी! PM मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांची लवकरच होणार भेट; टॅरिफ कमी होणार?
एनटीआर म्हणाला , “वॉर 2 भन्नाट असणार आहे आणि चित्रपट खूपच उत्तम बनला आहे. तुम्ही १४ ऑगस्टला हे वेड अनुभवाल. माझं आणि ऋतिक रोशन गरुचं करिअर जवळजवळ एकाच वेळी सुरू झालं. जेव्हा मी कहो ना प्यार है अनेक वर्षांपूर्वी पाहिला, तेव्हा मी अक्षरशः वेडावलो होतो. ते आज देशातील सर्वोत्तम डांसर्स पैकी एक आहेत. माझी प्रवास त्यांच्या प्रशंसेपासून सुरू झाला आणि अनेक वर्षांनी मला त्यांच्यासोबत अभिनय व नृत्य करण्याची संधी मिळाली.”
Video : “आता निवडणूक आयोगानेच भूमिका स्पष्ट करावी”, अजितदादांच्या मनात नेमकं काय?
एनटीआरच्या मते, वॉर 2 ही फक्त त्यांची बॉलिवूड एन्ट्री नाही, तर ऋतिक रोशन यांचंही तेलुगू सिनेमातलं आगमन आहे, कारण चित्रपटाच्या तेलुगू आवृत्तीत ऋतिक स्वतःचे डायलॉग्स स्वतःच म्हणणार आहेत.
गोवा मराठी चित्रपट महोत्सवामध्ये अजिंक्य देव यांच्या दोन चित्रपटाचा प्रिमियर; पाहा फोटो
तो पुढे म्हणाले, “हा फक्त एनटीआर चा हिंदी सिनेमात जाण्याचा चित्रपट नाही, तर खरं तर ऋतिक सरांचा तेलुगू सिनेमात येण्याचा आहे. माझं कुटुंब, चाहत्यांनी दिलेलं प्रेम आणि आशीर्वाद यामुळेच मी इथपर्यंत पोहोचलो आहे.” वॉर 2 ही यशराज फिल्म्स च्या प्रसिद्ध वायआरएफ स्पाई यूनिवर्स सीरीज मधील सहावी फिल्म आहे, ज्याने आतापर्यंत फक्त ब्लॉकबस्टर्स दिल्या आहेत.