मोठी बातमी! PM मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांची लवकरच होणार भेट; टॅरिफ कमी होणार?

मोठी बातमी! PM मोदी अन् डोनाल्ड ट्रम्प यांची लवकरच होणार भेट; टॅरिफ कमी होणार?

India US Relations : डोनाल्ड ट्रम्प सरकारने भारतावर 50 टक्के टॅरिफ आकारल्याने दोन्ही देशांतील संबंध (India Us Relations) ताणले गेले आहेत. ट्रम्प प्रशासनाने टॅरिफ कमी करण्याचे किंवा रद्द करण्याचे कोणतेही संकेत दिलेले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनीही भारत आपल्या शेतकऱ्यांच्या हिताशी कधीच तडजोड करणार नाही अशी प्रतिक्रिया दिली होती. या घडामोडीत आता एक मोठी बातमी मिळाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांची लवकरच भेट होऊ शकते अशी चिन्हे दिसत आहेत.

संयुक्त राष्ट्र महासभेचे शिखर संमेलन सप्टेंबर महिन्यात न्यूयॉर्क शहरात होणार आहे. या संमेलनात प्रमुख नेते जागतिक अजेंडा सेट करणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार या संमेलनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेचा दौरा करू शकतात. या दौऱ्यात पीएम मोदी डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेऊ शकतात. दोन्ही नेत्यांची ही भेट भारत अमेरिका संबंधच नाही तर व्यापार, टॅरिफ आणि भू राजकीय मुद्द्यांसाठी अतिशय महत्वाची ठरू शकते.

ट्रम्प अजबच! टॅरिफच्या नावाखाली सोयाबीन विक्रीसाठी आटापिटा; अमेरिकेकडून चीनची मनधरणी

जर ही भेट घडली तर मागील सात महिन्यांच्या काळात दोन्ही नेत्यांतील ही दुसरी भेट ठरेल. याआधी फेब्रुवारी महिन्यात पंतप्रधान मोदींनी व्हाइट हाऊसचा दौरा केला होता. ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात दोन्ही नेत्यांत चांगला समन्वय दिसून आला होता. परंतु दुसऱ्या कार्यकाळात टॅरिफ आणि व्यापाराच्या बाबतीत ट्रम्प यांची वक्तव्ये दोन्ही देशांत तणाव निर्माण करणारी ठरली आहेत.

भारत आणि अमेरिकेत द्विपक्षीय व्यापार कराराच्या संदर्भात काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. परंतु, कृषी आणि डेअरी क्षेत्राच्या बाबतीत भारताची अनिच्छा या करारात अडथळा ठरत आहे. यातच ट्रम्प प्रशासनाने भारतीय वस्तूंच्या आयातीवर 25 टॅरिफ आकारला. तसेच रशियाकडून तेल खरेदी केले जात असल्याने आणखी 25 टक्क्यांचा टॅरिफ असा एकूण 50 टक्के टॅरिफ आकारण्यात आला.

यातील अर्धा टॅरिफ 7 ऑगस्टपासून लागू झाला आहे. उर्वरित 25 टक्के टॅरिफची अंमलबजावणी 27 ऑगस्टपासून केली जाणार आहे. या मुदतीच्या आधी काही तोडगा निघतो का याची चाचपणी केली जात आहे. हा मुद्दा फक्त व्यापारापर्यंतच मर्यादीत नाही तर अमेरिकेच्या आर्थिक सुरक्षा आणि भारताच्या जागतिक व्यापार हिताच्या दरम्यान वादाचे प्रतीक बनला आहे.

अमेरिका भारतात नव्या वादाची सुरुवात

युक्रेन युद्धात भारताने रशियाकडून (Russia Ukraine war) मोठ्या प्रमाणात तेल खरेदी केली. अमेरिकेच्या दबावाला न जुमानता तेल खरेदी सुरुच आहे. भारताचा हा निर्णय अमेरिकेसाठी चिंतेचा ठरला आहे. या व्यवहारातून रशियाला मिळणाऱ्या पैशांमुळे युद्ध सुरू ठेवण्यात रशियाला मदत मिळत आहे असे अमेरिकेला वाटते. त्यामुळे या मुद्द्यावर ट्रम्प यांनी भारतावर टीका केली होती. तसेच भारताने रशियन तेलाची आयात कमी करावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती.

टॅरिफ वॉर थांबणार? अमेरिकेने घेतला मोठा निर्णय, चीनवरील कर निलंबन…

follow us
  • fb
  • instagram
  • youtube