Video : “आता निवडणूक आयोगानेच भूमिका स्पष्ट करावी”, अजितदादांच्या मनात नेमकं काय?

Ajit Pawar on Election Commission : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक आणि मतचोरीच्या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी सध्या (Rahul Gandhi) प्रचंड आक्रमक आहेत. राज्याच्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात राहुल गांधींनी गंभीर आरोप केले होते. इंडिया आघाडीने मोर्चाही काढला होता. या घडामोडींवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) जोरदार पलटवार केला. तसेच काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे याचं उत्तर निवडणूक आयोगाने दिलं पाहिजे असे अजित पवार म्हणाले. त्यांच्या या वक्तव्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. कारण नागपूर येथील पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी देखील अशीच भूमिका मांडली होती.
अजित पवार यांनी मंगळवारी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. पत्रकारांनी त्यांनी राहुल गांधींकडून होत असलेल्या आरोपांबाबत विचारले असता काही लोकांना यश मिळत नाही म्हणून त्यांच्याकडून अशा प्रकारची वक्तव्ये केली जात आहेत. संविधानानुसार ज्याला कुणाला प्रश्न उपस्थित करायचा आहे तो त्यांनी करावा असे अजित पवार यांनी सांगितले.
15 ऑगस्टला मासांहार विक्री बंद ठेवणे अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका
बारामतीत मी गडबड केली का?
देशात काही मोजक्या संस्था आहेत ज्यांना संविधानाने स्वायत्तता दिली आहे. निवडणूक आयोग त्यापैकी एक आहे. आयोगावर होत असलेल्या आरोपांत तथ्य आहे की नाही हे त्यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे. लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election) बारामती लोकसभा मतदारसंघात आमच्या उमेदवाराला 48 हजार मते कमी मिळाली होती. यानंतर पाच महिन्यांनंतर याच मतदारांनी विधानसभेच्या निवडणुकीत मला एक लाखांपेक्षा जास्त मतांनी निवडून दिलं.
लोकसभा निवडणुकीचा निकाल आम्ही स्वीकारला होता. नंतरच्या निवडणुकीत मी विजयी झालो तर मग मी तिथे काही गडबड केली का असा सवाल अजित पवार यांनी विचारला. एका पत्त्यावर 100-100 लोक सापडतात याबद्दल प्रश्न विचारल्यावर अजित पवार म्हणाले, या गोष्टी निवडणूक आयोग (Election Commission) पाहील. चूक काय आणि बरोबर काय आयोग याची तपासणी करील. चुकीचं असेल तर त्या हिशोबाने त्यांनी लक्ष दिलं पाहिजे. जर बरोबर असेल तर त्याचंही उत्तर आयोगाने दिलं पाहिजे.
#WATCH | Mumbai: On Lok Sabha LoP and Congress MP Rahul Gandhi’s allegations regarding Maharashtra elections, Deputy CM Ajit Pawar says, “See the example of Baramati. In the Lok Sabha elections in Baramati, our candidate got 48,000 fewer votes. I represent Barabaati. After five… pic.twitter.com/36R8fHvzqh
— ANI (@ANI) August 12, 2025
आयोगाच्या कामात कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही. ज्यांचा अधिकार आहे त्यांनी उत्तर द्यायला हवं. लोकशाहीत विविध पक्ष आपले मत मांडू शकतात म्हणजे आम्ही आयोगाची बाजू घेतो असं नाही असेही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, अजित पवार यांनी निवडणूक आयोगाबाबत केलेल्या वक्तव्याची जोरदार चर्चा होत आहे.
VIDEO : अजित पवार पहाटे उठतात, पण.. हिंजवडीचे प्रश्न सुटणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल