VIDEO : अजित पवार पहाटे उठतात, पण… हिंजवडीचे प्रश्न सुटणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

VIDEO : अजित पवार पहाटे उठतात, पण… हिंजवडीचे प्रश्न सुटणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

Supriya Sule Exclusive With Letsupp Marathi : सध्या राजकीय वर्तुळात पवार कुटूंब पुन्हा एकत्र येणार, अशी चर्चा आहे. दोन्ही राष्ट्रवादींच्या (NCP) मनोमिलनाकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. यावर खासदार सुप्रिया सुळे यांनी लेट्सअपच्या खासदारांचे रिपोर्ट कार्ड या कार्यक्रमात वक्तव्य केलं आहे. अजितदादा (Ajit Pawar) पहाटे उठून कामाला लागतात, यावर खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी भाष्य केलंय.

गेल्या 40 वर्षातील एका पक्षाला मिळालेल्या सर्वाधिक जागा; विदर्भ भाजप बैठकीत फडणवीसांचा नवा प्लॅन

राष्ट्रवादी मर्ज होणार?

यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, आगामी निवडणुकांमध्ये तुतारी चिन्हावर निवडणुका लढवणार. दोन्ही राष्ट्रवादी मर्ज होणार, हा विषय अजूनतरी माझ्या कानावर आला नाही. हा संभ्रम कोणाच्या मनात आहे, ते माहित नाही. परंतु माझ्यातरी मनात नाही. निर्णय घ्यायचा असेल तर कानावर काही आलं तरच निर्णय घेईल, असं देखील सुळे यांनी म्हटलं आहे. माळेगावच्या निवडणुकीत मी बिनविरोध तयारी दाखवली होती. मी त्यांना निवडणूक नको, असा प्रस्ताव दिला होता. सगळ्यांचे पैसे अन् वेळ वाचला असता, असा टोला त्यांनी लगावला आहे.

ब्रेकिंग : शनिशिंगणापूर देवस्थानात घोटाळ्यांचा स्फोट! संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटेंची आत्महत्या

हिंजवडीचे प्रॉब्लेम सुटणार का?

अजित पवार रोज पहाटे उठून काम करतात. यावर बोलताना सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, आम्ही सगळेच करतो. शरद पवार 84 वर्षांचे आहेत, ते पण करतात. यात मोठी गोष्टी काय आहे? असा सवाल देखील यावर सुप्रिया सुळेंनी केलंय. दादांच्या पहाटेच्या दौऱ्यामुळे हिंजवडीचे प्रॉब्लेम सुटणार का? यावर सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय की, मागील दोन वर्षानंतर दुसरी भेट आहे. माझी सरकारकडून अपेक्षा आहे. काही करा, आम्हाला सोई द्या. अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री अन् पालकमंत्री आहेत. ते मागच्या पंधरा दिवसांत दोन वेळा हिंजवडीला आले, मी त्यांचं मन:पूर्वक आभार मानते, असंही यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

ग्रामपंचायतवर देखील अन्याय

महापालिकेविषयी काहीही निर्णय घ्या. पण काहीतरी निर्णय घ्या. तेथील लोकांवर अन् ग्रामपंचायतवर देखील अन्याय आहे, असं देखील खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटलंय. अनेकदा सत्ताधारी गरज नसलेली विधायकं देखील पास करतात, असंही सुळेंनी म्हटलंय. माध्यमांवर अंकुश नको, त्या विधेयकाचा आम्ही विरोध करणार. रिपोर्टिंग करताना अंकुश ठेवला, तर लोकशाहीसाठी घातक आहे, असं देखील सुळेंनी म्हटलंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube