गुटखा विक्रीच्या हप्त्याचे कनेक्शन पाचपुते कुटुंबाशी! राहुल जगतापांचा आमदार पाचपुतेंवर निशाणा

Rahul Jagtap Criticize MLA Vikram Pachpute : आमदार विक्रम पाचपुते यांनी (MLA Vikram Pachpute) पनीर भेसळीचा मुद्दा विधिमंडळ अधिवेशनात उपस्थित केला, परंतु दूध भेसळीवर गप्प आहेत. त्यांच्या घराजवळ चालणाऱ्या दूध भेसळीबद्दल का बोलत नाहीत? असा सवाल उपस्थित करत माजी आमदार राहुल जगताप (Rahul Jagtap) यांनी आमदार पाचपुते यांच्यावर टीका केली. तसेच गुटखा विक्रीच्या हप्त्याचे कनेक्शन (Gutkha sale) पाचपुते कुटुंबाशी असल्याचा आरोपही त्यांनी यांनी केला. ते रविवारी अहिल्यानगर येथे माध्यमांशी बोलत होते.
सखोल चौकशी होण्याची आवश्यकता
आमदार पाचपुते यांना त्यांच्या घरापासून अर्धा किलोमीटवर अंतरावर सुरु असलेली बाळासाहेब पाचपुते यांची भेसळयुक्त पावडर दिसली नाही. त्यांनी तीन जिल्ह्यात भेसळयुक्त पावडरचा पुरवठा केला आहे. त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल (Ahilyanagar Politics)आहे. त्याचे पुढे काय झाले? पाचपुतेंनी भेसळयुक्त पनीरसोबत दुधाचा मुद्दा का उपस्थित केला नाही? बाळासाहेब पाचपुते कोणाचा कार्यकर्ता आहे? तो आजपर्यंत कोणाचं काम करत होता? याची सखोल चौकशी होण्याची आवश्यकता आहे, असे माजी आमदार जगताप यांनी म्हटले.
राही बर्वेच्या आत्मचरित्राचा गौरव! बहिण फुलवाची पोस्ट नेटिझन्सच्या मनाला भिडली
गुटख्याचे हप्ते कुणी घेतले?
राहुल जगताप पुढे म्हणाले की, अवैध गुटखा विक्रीचा विषय आमदार जगताप यांनी उपस्थित केला. परंतु श्रीगोंदा तालुक्यात चौकशी केली, तर आजपर्यंत गुटख्याचे हप्ते कुणी घेतले? त्यामध्ये काही मागे पुढे झाले का? यामुळे त्यांनी हा मुद्दा उपस्थित केला? इतकी वर्ष झाले त्यांचे वडील बबनराव पाचपुते आमदार होते, त्यांच्याकडे सत्ता होती, इतके वर्ष त्यांनी हा मुद्दा का उपस्थित केला नाही. पोलीस प्रशासन काम करीत नव्हते का? पोलीस काम करत नसतील तर त्यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदन का दिले नाही? हा विषय घेतल्यानंतर काही शिजणार आहे का? याचीही चौकशी झाली पाहिजे.
आपण मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या कानावर हा विषय घालणार आहोत. त्यांच्या घरापासून अर्धा किलोमीटर अंतरावर दूध भेसळ चालत असेल आणि यावर विद्यमान आमदार गप्प आहेत, हेही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या कानावर घालणार आहे, असे माजी आमदार जगताप म्हणाले.