आमदार पाचपुतेंच्या अडचणीत वाढ, कोर्टाने बजावले पकड वॉरंट, ‘हे’ प्रकरण येणार अंगलट

आमदार पाचपुतेंच्या अडचणीत वाढ, कोर्टाने बजावले पकड वॉरंट, ‘हे’ प्रकरण येणार अंगलट

अहिल्यानगर : श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रम पाचपुतेंच्या (Vikram Pachpute) अडचणीत वाढ झाली आहे. आ. पाचपुतेंना श्रीरामपूर न्यायालयाने Shrirampur court) पकड वॉरंट बजावलं. एका साखर कारखान्याला देण्यात आलेल्या २० लाख रुपयांच्या धनादेश अनादरप्रकरणी श्रीरामपूरच्या न्यायदंडाधिकारी (क्रमांक २) न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट जारी केलंय.

भारतीय हवाई हल्ल्यानंतर… पाकिस्तानी शेअर बाजारात मोठा भूकंप, 6000 अंकांनी कोसळला 

आमदार तथा हिरडगाव येथील साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडचे ​​माजी अध्यक्ष विक्रम बबनराव पाचपुते यांच्यासह कारखान्याच्या व्यवस्थापकांवर न्यायालयाने ही कठोर कारवाई केली आहे. श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याला देण्यात आलेल्या २० लाख रुपयांच्या धनादेश अनादरप्रकरणी न्यायालयाने त्यांच्याविरुद्ध पकड वॉरंट जारी केलंय. दरम्यान, धनादेश अनादर प्रकरणासारख्या घटनांमुळे साईकृपाच्या आर्थिक विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

‘ऑपरेशन सिंदूर’नं बिथरला पाकिस्तान; भारताला उत्तर देण्यासाठी पाकिस्तानकडे ‘हे’ 5 पर्याय 

हे प्रकरण श्रीरामपूर येथील न्यायदंडाधिकारी (क्रमांक २) यांच्या न्यायालयात दाखल असून या प्रकरणात श्रीगोंदा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन न्यायालयात हजर करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र, श्रीगोंदा पोलिसांकडून वॉरंटची अंमलबजावणी होत नसल्याने आ. पाचपुते आणि व्यवस्थापक न्यायालयात हजर राहिले नाहीत.

दरम्यान, न्यायालयाने श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन तातडीने न्यायालयात हजर करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. पकड वॉरंटमध्ये कोणतीही चूक किंवा हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं.

पाचपुतेंच्या कायदेशीर अडचणींत वाढ…
हिरडगावचा साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेड हा कारखाना पूर्वी माजी आमदार बबनराव पाचपुते यांच्या कुटुंबाच्या मालकीचा होता. सध्या हा कारखाना गौरी शुगरचे अध्यक्ष बाबुराव बोत्रे पाटील यांच्या नियंत्रणाखाली आहे. तरीही कारखान्याच्या मागील आर्थिक व्यवहारांमुळे पाचपुते कुटुंबाला कायदेशीर अडचणींचा सामना करावा लागतोय. या प्रकरणात, आ. विक्रम पाचपुते आणि कारखाना व्यवस्थापकविरुद्ध पकड वॉरंट जारी करण्यात आल्यानं श्रीगोंदा आणि श्रीरामपूर परिसरात चर्चेला उधाण आलं.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube