ब्रेकिंग : शनिशिंगणापूर देवस्थानात घोटाळ्यांचा स्फोट! संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटेंची आत्महत्या

ब्रेकिंग : शनिशिंगणापूर देवस्थानात घोटाळ्यांचा स्फोट! संस्थानचे माजी विश्वस्त नितीन शेटेंची आत्महत्या

Scams explode in Shani Shingnapur temple! Nitin Shete ended his life, fear of investigation or internal politics : महाराष्ट्रातील प्रसिद्ध शनिशिंगणापूर देवस्थान पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. देवस्थानचे उप कार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संशयास्पद परिस्थितीत आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्या मृत्यूमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नसले, तरी गावात आणि जिल्हाभरात चर्चांना उधाण आले आहे – “देवस्थानातील भ्रष्टाचार, आर्थिक घोटाळे, आणि चौकशीची भीती यामुळेच हे टोकाचे पाऊल उचलले गेले का?”

राही बर्वेच्या आत्मचरित्राचा गौरव! बहिण फुलवाची पोस्ट नेटिझन्सच्या मनाला भिडली

गावातील अनेक नागरिकांनी थेट आरोप करत म्हटले आहे की, देवस्थान व्यवस्थापनामध्ये गेल्या काही वर्षांपासून अनेक आर्थिक अनियमितता व निर्णय प्रक्रियेतील अपारदर्शकता सुरू आहे. काहीचे असे म्हणणे आहे की, “नितीन शेटे यांच्याकडे अनेक गोपनीय फाईल्स व माहिती होती, जी देवस्थानातील काही बड्या व्यक्तींना उघडं पाडू शकत होती.” त्यामुळे ही आत्महत्या नव्हे तर संशयास्पद मृत्यू असल्याची मागणी नागरिकांकडून जोर धरत आहे.

…म्हणून विरोधक मंगळसूत्र चोर म्हणतात; पडळकरांच्या खास मित्राने सांगितली ‘ती’ घटना

नितीन शेटे यांनी आत्महत्या का केली, याचा तपशील अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेला नाही. पोलिसांकडून तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत असले, तरी संपूर्ण घटनेच्या मागे दबाव, धमक्या की काही मोठा कटकारस्थान आहे का, हे तपासाअंतीच उघड होईल.या घटनेनंतर स्थानिक राजकीय मंडळींनी मौन बाळगले आहे. शेटे यांच्या आत्महत्येचा संबंध कोणत्या बड्या नेत्यांशी आहे का, हे सुद्धा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.

इंडिया फर्स्ट! ‘वॉर 2’ ट्रेलरमध्ये ऋतिक-एनटीआरची शपथ, सोशल मीडियावर धुमाकूळ

संपूर्ण राज्याला हादरवणाऱ्या या घटनेचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. नितीन शेटे यांना आत्महत्येस प्रवृत्त करणारे कोण होते? देवस्थानातील घोटाळ्यांवर कोण प्रकाश टाकणार? आणि सगळ्यात महत्त्वाचे – हे फक्त आत्महत्या होती की काहीतरी लपवले जात आहे?

follow us
  • fb
  • instagram
  • youtube