इंडिया फर्स्ट! ‘वॉर 2’ ट्रेलरमध्ये ऋतिक-एनटीआरची शपथ, सोशल मीडियावर धुमाकूळ

India First Hrithik NTR Oath In War 2 : यश राज फिल्म्स ने वर्षातील सर्वात बहुप्रतिक्षित भारतीय चित्रपट वॉर 2 चा ट्रेलर प्रदर्शित केला आहे. या चित्रपटात (War 2 Trailer) भारतीय सिनेमाचे दोन दिग्गज कलाकार – ऋतिक रोशन ( Hrithik Roshan) आणि एनटीआर (NTR)– यांच्यात एक आक्रमक, जबरदस्त आणि थरारक संघर्ष दाखवण्यात आला आहे, जो प्रेक्षकांना थिएटरमध्ये एक अनोखा अनुभव देणार आहे. या ट्रेलरने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला (Entertainment News) आहे. देशभरातून या ट्रेलरला एकमुखी प्रतिसाद मिळत असून उत्तर आणि दक्षिण भारतातील दोन सुपरस्टार्स प्रथमच एकत्र येत असल्याने वॉर 2 खऱ्या अर्थाने पहिला ‘पॅन इंडिया’ ब्लॉकबस्टर ठरण्याची शक्यता आहे. मात्र ट्रेलरमधून सर्वात अधिक चर्चेत आलेला भाग म्हणजे ऋतिक आणि एनटीआर यांनी घेतलेली ‘इंडिया फर्स्ट’ शपथ, जी आज प्रेक्षकांच्या मनात ठसली आहे.
वाईआरएफ स्पाय युनिव्हर्स चे मुख्य लेखक श्रीधर राघवन म्हणाले, आदि (आदित्य चोप्रा) हे फारच स्पष्ट होते की, वॉर 2 चा एकही प्लॉट पॉइंट ट्रेलरमध्ये उघड होऊ नये. म्हणून आम्ही एक काल्पनिक शपथ तयार केली, जी हे गुप्त एजंट्स आपल्या (War 2) प्रशिक्षणादरम्यान घेतात – जिच्यामध्ये ते देशासाठी सर्वस्व अर्पण करण्याची तयारी दाखवतात. ही शपथ चित्रपटाच्या गूढ, नाट्यमय आणि तीव्र कथानकाला प्रतिबिंबित करते.
राघवन पुढे सांगतात, ट्रेलरमध्ये आपण पाहतो की ऋतिक रोशन आणि एनटीआर हे एकमेकांचे आरसारूप आहेत – दोघेही असाधारण, हिंस्र, प्रामाणिक आणि भारतमातेच्या रक्षणासाठी झटणारे सैनिक. पण तरीही ते एकमेकांविरुद्ध लढत आहेत. असं काय घडलं की हे दोन महानायक एकमेकांशी भिडले? हाच ट्रेलरमधील गूढ आहे, आणि हेच गूढ आम्हाला प्रेक्षकांसमोर हळूहळू उलगडायचं आहे.”
राघवन यांनी ट्रेलरमधील एक महत्त्वाचा मुद्दा ‘इंडिया फर्स्ट’ या घोषवाक्यावर सविस्तर भाष्य केलं. ते म्हणाले, ‘इंडिया फर्स्ट’ हा नेहमीच वाईआरएफ स्पाय युनिव्हर्स मधील प्रत्येक एजंटसाठी प्रेरणादायी ब्रीदवाक्य राहिला आहे. परंतु या चित्रपटात आम्ही त्याला खुलेपणाने मांडले आहे, कारण त्याची भूमिका संपूर्ण कथानकाच्या केंद्रस्थानी आहे. आता पुढे ‘इंडिया फर्स्ट’ हेच संपूर्ण युनिव्हर्समधील एजंट्ससाठी युद्ध घोषणा असणार आहे.
वॉर 2 च्या प्रमोशनद्वारे यश राज फिल्म्स हे ऋतिक रोशन आणि एनटीआर यांच्या 25 वर्षांच्या सिनेमातील योगदानाचा गौरव करत आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित ही फिल्म वाईआरएफ स्पाय युनिव्हर्स चा भाग असून, ती 14 ऑगस्ट रोजी हिंदी, तेलुगू आणि तामिळ भाषांमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कियारा अडवाणी देखील मुख्य भूमिका साकारत आहे.
वाईआरएफ स्पाय युनिव्हर्स शपथ
मैं शपथ लेता हूँ –
कि मैं अपना नाम, अपनी पहचान, अपना घर, परिवार
सब त्याग कर एक साया बन जाऊँगा।
एक गुमनाम… बेनाम… अनजान साया।
मैं शपथ लेता हूँ –
मैं वो सब करूँगा…
जो कोई और नहीं कर सकता।
जो जंग कोई नहीं लड़ सकता…
वो मैं लड़ूँगा।
हर दोस्त, हर साथी, हर उस चेहरे से मुँह मोड़ लूँगा
जिसे कभी प्यार किया।
और पलट कर कभी पीछे नहीं देखूँगा।
अच्छाई-बुराई, सही-गलत, पाप-पुण्य की हर
लकीर को मिटा दूँगा।
मैं वो बलिदान दूँगा जिसका कोई गवाह नहीं होगा।
जिसकी क़ीमत मैं अपनी जान से… या फिर आत्मा से चुकाऊँगा।
अब मैं इंसान नहीं, सिर्फ़ एक हथियार हूँ…
जंग का हथियार – या तो मारूँगा या मरूँगा।
डेथ बीफोर डिस हॉनर
सर्विस बीफोर सेल्फ
इंडिया फर्स्ट