War 2 : ऋतिक-एनटीआरचा अॅक्शन ब्लास्ट! 25 वर्षांचा स्टारडम, ट्रेलर 25 जुलै रोजी धडकणार

War 2 : ऋतिक-एनटीआरचा अॅक्शन ब्लास्ट! 25 वर्षांचा स्टारडम, ट्रेलर 25 जुलै रोजी धडकणार

YRF Launch War 2 Trailer On July 25 : ऋतिक-एनटीआरचा ‘वॉर २’मध्ये (War 2) महास्फोटक सामना चाहत्यांना दिसणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर केव्हा रिलीज होणार, याकडे चाहत्यांचं लक्ष लागलेलं (Hrithik Roshan and NTR) होतं. अखेर त्यांची प्रतिक्षा संपलेली आहे. येत्या तीन दिवसांतच हा ट्रेलर चाहत्यांच्या भेटीला येणार आहेत.

‘वॉर 2’ मध्ये 25 या अंकाला विशेष महत्त्व! यशराज फिल्म्सच्या (वायआरएफ ) स्पाय यूनिव्हर्समधील सर्वात बहुप्रतीक्षित अ‍ॅक्शन थ्रिलर ‘वॉर 2’ मध्ये ऋतिक रोशन आणि एनटीआर यांची जोडी (Entertainment News) एकत्र पाहायला मिळणार आहे. हा प्रोजेक्ट म्हणजे आदित्य चोप्रा यांचा मास्टरस्ट्रोक मानला जात आहे. दिग्दर्शक अयान मुखर्जी यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. विशेष म्हणजे, 2025 मध्ये ऋतिक रोशन आणि एनटीआर दोघांचेही चित्रपटसृष्टीतील 25 वर्षे पूर्ण होत आहेत. वायआरएफ ही ऐतिहासिक संधी साधत 25 जुलै रोजी ‘वॉर 2’ चा ट्रेलर रिलीज करणार आहे.

ब्रेकिंग! राष्ट्रपतींनी स्वीकारला उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा

वायआरएफ ने आज त्यांच्या सोशल मीडियावर ट्रेलर लॉन्चबाबत अधिकृत घोषणा करत म्हटलं, 2025 मध्ये भारतीय चित्रपटसृष्टीतील दोन आयकॉन्स त्यांचा वैभवशाली प्रवासाचे 25 वर्षे पूर्ण करत आहेत. या एकदाच येणाऱ्या संधीचा सन्मान करण्यासाठी, वायआरएफ 25 जुलै रोजी ‘वॉर 2’ ट्रेलर लॉन्च करणार आहे! टाइटन्सच्या या महाकाव्य संघर्षासाठी तयार व्हा! आपले कॅलेंडर नक्की मार्क करा.

सामना रद्द झाल्याने खवळला पाकिस्तान, भारताविरुद्ध घेतला ‘हा’ निर्णय; नुकसान कुणाचं?

‘वॉर 2’ हा चित्रपट 14 ऑगस्ट 2025 रोजी हिंदी, तेलुगू आणि तमिळ भाषांमध्ये संपूर्ण जगभरात प्रदर्शित होणार आहे. यामध्ये कियारा अडवाणी प्रमुख अभिनेत्रीच्या भूमिकेत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube