शनैश्वर देवस्थानच्या कारभारात गैरव्यवहार, आर्थिक व्यवहाराचे थेट फॉरेन्सिक ऑडिट होणार
एकूणच प्रशासक आल्यापासून शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कारभारात प्रचंड सुधारणा झाली असून उत्पन्न देखील वाढलंय.
अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर (Ahilyanagar) येथील जगप्रसिद्ध शनैश्वर देवस्थानच्या कारभारात गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारींनंतर शासनाने प्रत्यक्ष कारवाई सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने फॉरेन्सिक पथकाकडून 2020 ते 2025 या कालावधीतील प्रशासकीय निर्णय, आर्थिक व्यवहार याचे फॉरेन्सिक ऑडिट केलं जाणार आहे.
या कालावधीत घेण्यात आलेल्या प्रशासकीय निर्णयाची समीक्षा करणे, आर्थिक व्यवहार तपासणे त्यात काही अनियमितता असेल तर भविष्यात सुधारणा करणे तसेच अनियमितता करणाऱ्यांवर वरिष्ठांच्या आदेशाने योग्य करावाई करणे असा या फॉरेन्सिक ऑडिटचा उद्देश आहे.
संघप्रमुख मोहन भागवत जेन झी शी संवाद साधणार, युवा-नेतृत्व परिषदेचे NMACCमध्ये आयोजन
हे फॉरेन्सिक ऑडिट झाल्यानंतर भविष्यात देवस्थान कारभारात सुरळीतपणा तर येणारच आहे मात्र तत्कालीन देवस्थान विश्वस्त मंडळाकडून करण्यात आलेल्या कथित आर्थिक घोटाळा अनियमितता बाहेर येणार आहे…त्यामुळे या फॉरेन्सिक ऑडिटकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय.
दरम्यान शासनाने देवस्थान विश्वस्त मंडळ बरखास्त करून प्रशासक आणल्यानंतर शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या उत्पन्नात तब्बल 15 कोटी रुपयांची वाढ झाल्याचे माहिती उपकार्यकारी अधिकारी यांनी दिली आहे.
प्रशासक मंडळ आल्यानंतर देवस्थानचा होणारा अनावश्यक खर्चात कपात करण्यात आली आहे. सोबतच उत्पन्न वाढीसाठीचे स्रोत हे वाढवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. एकूणच प्रशासक आल्यापासून शनैश्वर देवस्थान ट्रस्टच्या कारभारात प्रचंड सुधारणा झाली असून उत्पन्न देखील वाढलंय.