अजितदादांच्या विमान अपघाताबद्दल त्या दोघांनी बोलायला हवं होत, रोहित पवारांनी थेट नावच घेतलं
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघातावरून आमदार रोहित पवार यांनी आता राजकीय नेत्यांची नाव घेत भाष्य केलं
आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन आपले काका आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताविषयी अनेक खळबळजनक दावे केलेत. त्यांनी आजितदादांसोबत 100 टक्के घातपात झालेला असण्याची शक्यता आहे असा थेट उच्चार केला आहे. त्यांच्या या वक्तव्याने तर्तवितर्क लढवले जात आहेत. दरम्यान, हे बोलताना, मी जे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं आहे ते अजित पवारांचे जवळचे सहकारी आणि मित्र सुनिल तटकरे प्रफुल पटेल यांनी सांगायला हव होत अस म्हणत थेट या दोघांकडं बोट केल्याने अनेक चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता आहे.
सुनेत्रा पवार यांची इच्छा नसताना त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ कशी घेतील, यासाठी प्रयत्न करण्यात आल्याची शंका रोहित पवार यांनी उपस्थित केली. तसेच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या खूप ओळखी आहेत. माझ्याऐवजी त्यांनीच अजितदादांच्या अपघाताविषयीचे प्रझेंटेशन द्यायला हवे होते, असं म्हणत रोहित पवारांनी थेट त्यांच्याकडं बोट केलं आहे. आमच्यासाठी अजितदादांसोबत घातपात झाला का? तो दादासोबतच का झाला, याबाबत आमच्या मनात शंका आहे. या प्रश्नांची उत्तरं मिळणं हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे.
अनेक लोकांची वेगवेगळी प्राथमिकता असू शकते. अजितदादांच्या अपघाती निधनाची तपास व्हावा ही कदाचित त्यांची प्राथमिकता नसेल. त्यांच्यासाठी सत्तेत राहणं ही प्राथमिकता असेल, असा टीकाही रोहित पवार यांनी तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर केली आहे, त्याचबरोबर त्यांचे किंवा सत्तेत असणाऱ्यांसाठी अजित पवार कुणीही असले तरी ते माझ्यासाठी माझे काका होते. त्यामुळे माझे काका गेल्याने मला बोलण्याचा अधिकार आहे.
तटकरे, प्रफुल्ल पटेल यांच्यावर टीका
सत्तेत राहण्यासाठी त्यांनी घाईत शपथविधी घेतला. सुनेत्रा काकींची इच्छा नसताना शपथविधी कसा होईल याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे इतके कॉन्टॅक्ट आहेत. एव्हिएशन मंत्रालय त्यांनी सांभाळलंय, एमआरए त्यांचं स्वतचं आहे. म्हणजे विमानाचे मेंटेनन्स कसे होते हे त्यांना माहीत आहे. ते दादांचे दोस्त आहेत. दादांसोबत राहिले आहेत. त्यांनी माझ्या जागेवर प्रेझेंटेशन करण्याची गरज होती, असंही रोहित पवार म्हणाले.
