15 ऑगस्टला मासांहार विक्री बंद ठेवणे अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

15 ऑगस्टला मासांहार विक्री बंद ठेवणे अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केली भूमिका

Ajit pawar On Chicken Mutton Shop : राज्यात 15 ऑगस्ट रोजी मांसविक्री बंद ठेवण्याच्या (Chicken Mutton Shop) आदेशावरुन राजकारण चांगलेच तापलं आहे. राज्यातील काही महानगरपालिकांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन, मटण आणि कत्तलखाने बंद ठेवण्याचे आदेश दिल्यानंतर विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे. तर दुसरीकडे सरकारच्या या आदेशावरुन महायुतीमध्ये (Mahayuti) देखील दुमत असल्याचे दिसून येत आहे. कोणी काय खावं आणि कोणी काय खाऊ नये, यावर बंदी घालणं अयोग्य आहे. असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यातील मालेगाव महापालिका, छत्रपती संभाजीनगर महापालिका आणि केडीएमसी आयुक्तांनी 15 ऑगस्ट रोजी चिकन, मटणविक्री बंद ठेवण्याचे आदेश जारी केल्याने विरोधक राज्य सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहे.

या प्रकरणात माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले की, मी टिव्हीवर बातमी पाहिली, श्रध्देचा विषय असतो त्यावेळी अशा प्रकारे बंदी घातली जाते. आषाढी एकादशी, महावीर जयंती अशावेळी असा निर्णय घेतला जातो. कोकणात आपण गेलो तर प्रत्येक भाजीत सुकट टाकतात. त्यामुळे अशी बंदी घालणे योग्य नाही. भावनिक मुद्दा असेत तर त्या काळासाठी बंदी घातली तर लोक समजू शकतात पण 15 ऑगस्ट रोजी अशी बंदी महाराष्ट्रात घालणे योग्य नाही. असं माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले. तसेच या प्रकरणात सविस्तर माहिती घेणार असेही माध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले.

तर दुसरीकडे स्वातंत्र्यदिनी आम्ही आमच्या घरात काय खायचं हे आमचं स्वातंत्र्य आहे. आम्ही निश्चित 15 ऑगस्ट रोजी नॉन व्हेज खाणार असं आदित्य ठाकरेंनी (Aaditya Thackeray) म्हटले आहे. तसेच त्यांनी कल्याण डोंबिवलीच्या महापालिका आयुक्तांचे निलंबन करण्यात यावे अशी मागणी देखील केली आहे.

नेमकं प्रकरण काय?

मालेगाव शहरातील सर्व खाजगी कत्तलखाने, म्हैस मांस विक्रेते, बकरा मटन व कोंबडी मटन विक्रेते यांनी आपली दुकाने 15, 20 आणि 27 ऑगस्ट या दिवशी पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश मालेगाव महानगरपालिकेने दिले आहे तर संभाजीनगरमध्ये 15 ऑगस्ट रोजी शहरातील सर्व कत्तखाने बंद ठेवण्याचे आदेश संभाजीनगर महापालिकेकडून देण्यात आले.

ITR Filing 2025 : करदात्यांना दिलासा, ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार आयकर रिटर्न

महापालिकेच्या आदेशानुसार, 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन, श्रीकृष्ण जयंती 20 ऑगस्ट आणि जैन पर्युषण पर्व व 27 ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी, जैन संवत्सरी असल्याने मासविक्री दुकाने आणि कत्तखाने बंद ठेवण्याचे आदेश पालिकेकडून देण्यात आले आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube