कुठून पुण्याचा पालकमंत्री झालो, ह्यांनी फक्त उपदेश घ्यायचे; अजित पवारांची तुफान फटकेबाजी

Ajit Pawar On Sayaji Shinde : अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांचा 66 वा वाढदिवसाचा कार्यक्रम पिंपरी- चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तुफान फटकेबाजी केली. तसेच सयाजी शिंदे यांच्यासाठी गाणं देखील गायलं. तसेत कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो असं वाटायला लागलंय, जो उठतो तो मला उपदेश देतो असं म्हणत त्यांनी पुणेकरांची फिरकी देखील या कार्यक्रमात बोलताना घेतली.
या कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्या वृक्षारोपण कार्याचं कौतुक आपण प्रत्येक वर्षी 25 कोटी वृक्षारोपण करण्याचा संकल्प घेतला आहे. आमच्या सत्ताकाळाक आम्ही 100 कोटी झाडं लावणार आणि जगवणार आहोत. तसेच प्रत्येक वर्षी आपण असं करत राहिलो तर पुढच्या 20 वर्षांत आपण निसर्ग राखण्यात यशस्वी होऊ, असं अजित पवार म्हणाले. तसेच सयाजी हा रांगडा गडी आहे, जिथं असेल तिथं त्यांच्यातील हा रांगडेपणा दिसून येते. सयाजी आणि माझ्यात हे साधर्म्य आहे म्हणून आमची वेव लेंथ जुळली असेही अजित पवार यावेळी म्हणाले.
सयाजी शिंदेंसाठी गाणं
सयाजीच्या जे पोटात आहे तेच ओठात आहे. त्यांच्यात आणि माझ्यात हाच गुण सारखा असल्याने माझे आणि त्यांची वेव लेंथ जुळलेली असं म्हणत अजित पवार यांनी पिंजरा या चित्रपटातील गाणं ‘गडी अंगाने उभानी आडवा, त्याच्या रुपात गावरान गोडवा’, हे गाणं सयाजी शिंदेसाठी म्हटले.
कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो
तर या कार्यक्रमात बोलताना पुण्यात भविष्यात होणाऱ्या कामाबद्दल माहिती देताना कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो असं म्हणत त्यांनी पुणेकरांची फिरकी घेतली. यावेळी अजित पवार म्हणाले की, पिंपरी ते चाकणचा मार्ग आम्हाला सहा- सहा असा बारा पदरी रस्ता करावा लागणार आहे. वर पूल सहा लेनचा आणि त्यावर मेट्रोही करत आहे. मी कामाचा माणूस आहे. मी अधिकाऱ्यांना कामाला लावले आहे. कुठून मी पुण्याचा पालकमंत्री झालो, असं वाटायला लागलंय असं यावेळी अजित पवार म्हणाले.
Video : रोहित पवार म्हणजे बालिश ‘बॉय’; पडळकरांनी शेपटावर पाय ठेवत डिवचलं…
तर सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मला प्रश्न विचारला होता. शहरातील नदी लगतची दुर्गा देवी टेकडीवरची वृक्षतोड होणार, आपण पालकमंत्री म्हणून वृक्षतोड थांबवावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती. हे सगळं ऐकल्यावर मी कुठुन पुण्याचा पालकमंत्री झालो, असं मला वाटायला लागलं आहे. जो उठतो आणि मला उपदेश देतो. सगळा मक्ता मीचं घेतला आहे, ह्यांनी फक्त उपदेश घ्यायचे ठीक आहे धन्यवाद अशी मिश्कील फटकेबाजी यावेळी अजित पवार यांनी केली.