मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात तीन नवीन महापालिका होणार, अजित पवारांनी काय सांगितलं?

मोठी बातमी! पुणे जिल्ह्यात तीन नवीन महापालिका होणार, अजित पवारांनी काय सांगितलं?

Ajit Pawar Big Announcement : राज्याचे उपमु्ख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी (Ajit Pawar) मोठी घोषणा केली आहे. अजित पवार आज पहाटेच्या सुमारास वाहतूक कोंडी होणाऱ्या चाकण चौक (Pune News) आणि परिसराची पाहणी केली. याचवेळी चाकणला स्वतंत्र महानगरपालिका होणार असल्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले.

पुणे-नाशिक आणि चाकण-शिक्रापूर मार्गावरील चौकात वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. या चौकातील वाहतुकीची पाहणी करण्यासाठी अजित पवार आज सकाळीच येथे आले होते. याच चौकातून एमआयडीसीत जावे लागते. या एमआयडीसीत दीड हजार कंपन्या आहेत. या कंपन्यांत साडेतीन लाखांच्या आसपास कर्मचारी काम करतात. त्यामुळे परिसरात हजारो वाहनांची ये जा सुरू असते. या चौकातील वाहतूक कोंडी कमी होण्याची गरज आहे. यासाठी ठोस निर्णयाची गरज आहे. त्यामुळे चाकणला स्वतंत्र महापालिका होणार असल्याचे सूतोवाच अजित पवार यांनी केले.

पुणे जिल्ह्यात होणार तीन महापालिका

चाकण आणि परिसरात नवी महानगरपालिका करावी लागणार आहे.काहींना आवडेल किंवा आवडणार नाही पण हे आता करावंच लागणार आहे. पुणे जिल्ह्यात तीन महानगरपालिका कराव्या लागणार आहेत. मांजरी, फुरसुंगी, उरळी देवाची या भागात एक महापालिका, चाकण आणि हिंजवडी परिसरात एक एक महापालिका करावी लागणार असे अजित पवार यांनी यावेळी सांगितले.

मोठी बातमी, पुणे ग्रामीण जिल्ह्यात 21 ऑगस्टपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

अजितदादांनी पोलीस आयुक्तांनाच खडसावलं

अजित पवार यांनी आज पहाटेच्या वेळेस या भागातील वाहतुकीची पाहणी केली. यावेळी पोलिसांवर काहीसे संतापल्याचे दिसून आले. मी सकाळी 6 वाजता दौरा करतोय एक गाडी थांबली की लगेच वाहनांच्या रांगा लागताहेत. आताच अशी परिस्थिती असेल तर पिक टाइममध्ये काय अवस्था होत असे असे अजित पवार म्हणाले. याचवेळी पिंपरी चिंचवड पोलिसांनी वाहनं रोखून धरली होती. त्यामुळे अजित पवार यांनी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांना चांगलच खडसावलं. ओ चौबे हे बरोबर नाही. मुर्खासारखी ही वाहनं थांबवून कोंडी का केली आहे? सगळी वाहतूक सुरू करा असे अजित पवार यावेळी म्हणाले.

VIDEO : अजित पवार पहाटे उठतात, पण.. हिंजवडीचे प्रश्न सुटणार का? खासदार सुप्रिया सुळेंचा सवाल

follow us
  • fb
  • instagram
  • youtube