टी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलिया संघात बदल; ‘या’ खेळाडूला मोठी जबाबदारी

T20 World Cup 2026 : पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषकापूर्वी (T20 World Cup 2026) ऑस्ट्रेलियाने (Australia) मोठी घोषणा करत या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या संघाना इशारा दिला आहे. ऑस्ट्रेलियन कर्णधार मिचेल मार्शने (Mitchell Marsh) मोठी घोषणा करत टी-20 क्रिकेटमध्ये स्टार फलंदाज ट्रॅव्हिस हेड (Travis Head) ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीराची भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे आता टी-20 विश्वचषकात ऑस्ट्रेलियासाठी कर्णधार मिचेल मार्श आणि डेव्हिड मार्श डावाची सुरुवात करणार आहे.
टी-20 क्रिकेटमधून डेव्हिड वॉर्नरने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्याच्या जागी अनेक खेळाडूंना सलामीवीराची भूमिका देण्यात आली होती. पण कोणताही खेळाडू तसे करू शकला नाही. मॅथ्यू शॉर्ट, ग्लेन मॅक्सवेल आणि जेक फ्रेझर ऑस्ट्रेलियासाठी सलामीवीर म्हणून खेळू शकले आहेत. पण वॉर्नरइतके कोणीही प्रभावित करू शकले नाही. तर आता मोठी घोषणा करत ट्रॅव्हिस हेड संघासाठी सलामी खेळेल अशी माहिती मिचेल मार्शने दिली आहे. आम्ही एकत्र खूप खेळलो आहोत, आमचे खूप चांगले संबंध आहेत, म्हणून आम्ही डावाची सुरुवात करू. असं माध्यमांशी बोलताना मिचेल मार्श म्हणाला.
तर दुसरीकडे यावेळी मिशेल मार्शने टिम डेव्हिडबद्दलही बोललो. त्याने नुकतेच वेस्ट इंडिजविरुद्ध 37 चेंडूत शतक झळकावले. मार्शने डेव्हिडबद्दल सांगितले की आम्ही याबद्दल बोललो आहोत. आम्ही वेस्ट इंडिजमध्ये पाहिले की तो शानदार फलंदाजी करत होता. तो यासाठीच बनलेला आहे. तो जितक्या जास्त चेंडू खेळेल तितकेच तो आपल्यासाठी अधिक सामने जिंकेल अशी आशा आहे. तर ऑस्ट्रेलिया 10 ऑगस्टपासून दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. यामध्ये अनेक खेळाडूंना संधी देण्यात आली आहे.
Video : दिल्लीत मोठी दुघर्टना, मंदिराती भिंत कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू
टी-20 मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा संघ
मिशेल मार्श (कर्णधार), शॉन अॅबॉट, टिम डेव्हिड, बेन द्वारशीस, नाथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, जोश हेझलवुड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅट कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मिशेल ओवेन, मॅथ्यू शॉर्ट, ॲडम जम्पा