Video : दिल्लीत मोठी दुघर्टना, मंदिराती भिंत कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू

Video : दिल्लीत मोठी दुघर्टना, मंदिराती भिंत कोसळल्याने 7 जणांचा मृत्यू

Jaitpur Temple Wall Collapse : देशाची राजधानी दिल्लीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, दिल्लीतील जैतपूर येथील हरी नगरमध्ये मोठी दुघर्टना घडली आहे. या परिसरात एका जून्या मंदिराची भिंत कोसळल्याने 7 जणांचा (Jaitpur Temple Wall Collapse) मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, यामध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश आहे. सध्या घटनास्थळावर बचावकार्य सुरु असून एकावर उपचार सुरु असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताचा आवाज इतका मोठा होता की जवळच्या घरांमधील लोक घाबरले. अग्निशमन दलाच्या जवानांनी ढिगाऱ्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यास आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्यास सुरुवात केली आहे.

हरी नगरमध्ये भिंत कोसळण्याच्या घटनेवर अतिरिक्त डीसीपी दक्षिण पूर्व ऐश्वर्या शर्मा म्हणाल्या, येथे एक जुने मंदिर आहे आणि त्याच्या शेजारी जुन्या झोपडपट्ट्या आहेत जिथे भंगार विक्रेते राहतात. रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे भिंत कोसळली. 8 लोक अडकले होते, ज्यांना वाचवण्यात आले आणि रुग्णालयात नेण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.  आमच्या मते, 3-4 लोक गंभीर जखमी आहेत. भविष्यात अशी घटना घडू नये म्हणून आम्ही आता या झोपडपट्ट्या रिकामी केल्या आहेत.

अग्निशमन दल आणि पोलिस पथके घटनास्थळी परिस्थिती हाताळत आहेत. पुढील धोका टाळण्यासाठी आजूबाजूचा परिसर रिकामा केला जात आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा दिल्लीतील जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

नगरच्या अमृत योजनेत अनियमितता अन् निधीचा गैरवापर? लंकेंनी मुद्दा नेला थेट दिल्लीत 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube