NZ vs WI : जस्टिन ग्रीव्हजचं शानदार द्विशतक, 160 ओव्हर फलंदाजी करत वेस्ट इंडिजने दिला न्यूझीलंडला धक्का

NZ vs WI : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असणाऱ्या तीन कसोटी मालिकेतील पहिला सामनला अनिर्णित राहिला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या

  • Written By: Published:
NZ Vs WI

NZ vs WI : न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिज यांच्यात सुरु असणाऱ्या तीन कसोटी मालिकेतील पहिला सामनला अनिर्णित राहिला आहे. या सामन्याच्या दुसऱ्या डावात परभव दिसत असताना वेस्ट इंडिजच्या फलंदाजांनी शानदार फलंदाजी करत सामना अनिर्णित राखला आहे. वेस्ट इंडिजच्या दुसऱ्या डावात जस्टिन ग्रीव्हजने द्विशतक झळकावून आपल्या संघाला पराभवापासून वाचवले.

न्यूझीलंडने (New Zealand) वेस्ट इंडिजसाठी 531 धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजने 457 धावा केल्या, परंतु सामन्यात वेळ शिल्लक नसल्याने हा सामना अनिर्णित घोषित करण्यात आला. या सामन्याच्या पहिल्या डावात न्यूझीलंडने 231 धावा केल्या प्रत्युत्तरात वेस्ट इंडिजचा संघ 167 धावांवर ऑलआउट झाला. तेजनारायण चंद्रपॉल आणि शाई होप यांनीही अर्धशतके झळकावली मात्र पहिल्या डावात न्युझीलंडने 64 धावांची आघाडी घेतली.

तर दुसऱ्या डावात शानदार फलंदाजी करत वेस्ट इंडिजसमोर (West Indies) तब्बल 531 धावांचे लक्ष्य दिले होते. दुसऱ्या डावात रचिन रवींद्रने 176 आणि कर्णधार टॉम लॅथमने 145 धावा केल्या. वेस्ट इंडिजला सामना वाचवण्यासाठी जवळपास 160 ओव्हर फलंदाजी करावी लागणार होती. 531 धावांचा पाठलाग करताना दुसऱ्या डावात वेस्ट इंडिजने 277  धावांवर 6 विकेट्स गमावले होते मात्र त्यानंतर जस्टिन ग्रीव्हजने (Justin Greaves) 388 चेंडूत 202 धावा केल्या.

जय पवार आणि ऋतुजा पाटील यांचा विवाह सोहळा बहरीनमध्ये संपन्न; पहा फोटो

शाई होपनेही 140 धावा जोडल्या. केमार रोचनेही 58 धावा केल्या आणि न्यूझीलंडला धक्का देत पहिला कसोटी सामना अनिर्णित राखला. 7 व्या विकेटसाठी रोच आणि ग्रीव्हजने 180 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे न्यूझीलंडला कसोटी जिंकणे अशक्य झाले.

follow us