जयंत पाटील अन् अजित पवारांच्या भेटीवरून भुजबळांचा सवाल; म्हणाले, आम्ही शत्रू… काय बिघडलं?

जयंत पाटील अन् अजित पवारांच्या भेटीवरून भुजबळांचा सवाल; म्हणाले, आम्ही शत्रू… काय बिघडलं?

Chhagan Bhujbal On Jayant Patil and Ajit Pawar’s meeting : सध्या राजकीय वर्तुळात अजित पवार (Ajit Pawar) आणि जयंत पाटील (Jayant Patil) यांच्या भेटीगाठीची चर्चा चांगलीच रंगलेली आहे. दरम्यान अजित पवार आणि जयंत पाटील यांच्या भेटीसंदर्भात विचारलं असता, दोघांच्या भेटीमध्ये काही गैर नसल्याचं छगन भुजबळ यांनी (Chhagan Bhujbal) सांगितलं आहे. एकीकडे भाजप आमदारांची संख्या वाढतच चालली आहे, अशातच एक नंबरचा पक्ष आपल्याला करायचा आहे. यासाठी कुठून कुठे जायचं आहे, याचा विचार करायला हवा असं देखील छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

जयंत पाटील आणि अजित पवार यांची काल भेट झाली आहे. त्यांच्यामध्ये अर्धा तास चर्चा झाल्याचं देखील वृत्त आहे. यावर छगन भुजबळ म्हणाले आमची पण चर्चा होते. जयंत पाटील आमच्या शेजारीच (Maharashtra Politics) बसतात. जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आम्ही बोलत असतो. चर्चा करत असतो, असं देखील भुजबळांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

जयंत पाटील मोठ्या कासाची पण…दूध चोरणारी म्हैस, पडळकरांची खोचक टीका

काय बिघडलं? असं आहे की, आम्ही शत्रू नाही. आम्हाला धडा मिळालेला (NCP Politics) आहे. विरोधी पक्ष आहेत. त्यांची मतं वेगळी आहेत, आमची मतं वेगळी आहेत. परंतु आम्ही काही एकमेकांचे शत्रू नाहीत, असं देखील छगन भुजबळ यांनी स्पष्ट केलंय.

भाजपचे आमदार किती? सव्वाशेच्या वरती ते आणखीन वाढतच चालले आहेत. आमचे आमदार किती? त्यामुळे आपल्याला कुठून कुठे जायचं आहे, याचा विचार करून काम करायला पाहिजे. माझा प्रश्न एवढाच आहे की, महात्मा ज्योतीराव फुले आणि महात्मा गांधी अन् महात्मा बसवेश्वर असे दोन-तीन ते महात्मा आहेत. महात्मा फुलेंना भारतरत्न द्यायचा, तर महात्मा गांधींना का द्यायचा नाही? असा सवाल देखील यावेळी छगन भुजबळ यांनी केलाय.

बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला आदर्श मानायचं? औरंगजेब वादावरुन RSS चा आक्रमक सवाल

महात्मा गांधींना देखील भारतरत्न द्या. महात्मा हे सगळ्यांच्या वरचे आहेत. या सगळ्या पदव्यांच्या वरती महात्मा गांधी, महात्मा ज्योतीराव फुले आहेत. भारतरत्न मोठा की महात्मा मोठा? असा सवाल देखील भुजबळांनी केला होता. यावर ते म्हणाले की, तुम्हीच सांगा. भारतरत्न मोठा असेल तर तो महात्मा गांधी यांना देखील द्या.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube