Chhagan Bhujbal : … तर मी मुख्यमंत्री झालो असतो; छगन भुजबळांनी सांगितला ‘तो’ किस्सा
Chhagan Bhujbal : जर मी काँग्रेस सोडली नसती तर मुख्यमंत्री झालो असतो. दिल्लीत माझ्या नावावर एकमत झाले होते पण मी शरद पवार (Sharad Pawar) साहेबांसोबत असल्याने मुख्यमंत्री झालो नाही असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केला आहे. ते आज जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्स (Jadhav Group of Institutes) , पुणे कडून आयोजित आठव्या युवा संसदेमध्ये बोलत होते.
यावेळी छगन भुजबळ म्हणाले की, मुख्यमंत्री होणे किंवा नाही होणे नशिबाची बाब आहे. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) देखील म्हणायचे की, माझा भुजबळ शरद पवारांनी घेऊन गेला, जर माझा भुजबळ गेला नसता तर मी त्याला मुख्यमंत्री केला असता असं ते म्हणायचे. त्यांचा शेवटपर्यंत माझ्यावर प्रेम होता असं छगन भुजबळ म्हणाले.
पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, ज्यावेळी काँग्रेसमधून शरद पवार बाहेर आले आणि मी सांगितलं की मी पवार साहेबांसोबत राहील त्यावेळेला काँग्रेसच्या सोनिया गांधी यांच्या कार्यलयातून मुकुल वासनी, शीला दीक्षित, कळमळी साहेब, राजेश पायलट आणि अहमद पटेल म्हणत होते की, तुम्ही दिल्लीला या आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री घोषित करतो. मात्र मी म्हटलो की, मी पवार साहेबांसोबत आलेलो आहे शिवसेना सोडून. त्यांनी मंडळाची अंमलबजावणी केली आहे. ओबीसी समाजाला आरक्षण दिले आहे. मी त्यांना सोडून येणार नाही. नाहीतर त्याच वेळी मी मुख्यमंत्री झालो असतो असं छगन भुजबळ म्हणाले.
तसेच त्याच्या आगोदर चार – पाच वर्षांपूर्वी विधानपरिषदेची निवडणूक झाली तेव्हा काँग्रेसने साडेतीन तिकिटे दिली होती. काँग्रेसने तेव्हा विलासरावांना तिकीट दिले नव्हते त्यामुळे ते शिवसेनेच्या तिकिटावर लढले आणि त्यांचा पराभव झाला. परंतु 1999 साली जी विधासभा निवडणूक झाली तेव्हा दोन काँग्रेस झाल्या होत्या तेव्हा मी पवार साहेबांसोबत आणि विलासराव काँग्रेसमध्ये होते. तेव्हा त्यांचे जास्त आमदार निवडून आले त्यामुळे ते मुख्यमंत्री आणि मी उपमुख्यमंत्री झालो. असं देखील या कार्यक्रमात बोलताना छगन भुजबळ म्हणाले.
गुंड थोडेच संप्रादाय चालवतात? मुंडेंना महंतांकडून क्लिनचीट…जरांगेंची सटकली
तसेच बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला सांगितले 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण त्या प्रमाणे मी वागत आलोय. त्यांनी दिलेली शिकवण आज ही माझ्यात आहे.असेही यावेळी भुजबळ म्हणाले.