Pakistan Train Hijack : बलुच लिबरेशन आर्मीने संपूर्ण ट्रेनचं केली हायजॅक; अनेकांचा जीव टांगणीला

Pakistan Train Hijack : बलुच लिबरेशन आर्मीने संपूर्ण ट्रेनचं केली हायजॅक; अनेकांचा जीव टांगणीला

Train Attacked in Balochistan : पाकिस्तानमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार, पाकिस्तानच्या बलुचिनस्तान (Balochistan) प्रांतातील फुटीरतावादी दहशतवाद्यांनी (बलुचिस्तान लिबरेशन आर्मी) 400 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनचे अपहरण (Train Attacked) केले आहे. माहितीनुसार, अपहरणामुळे 120 लोक दहशतवाद्यांच्या ताब्यात अडकले आहेत.

अपहरणकर्त्याला वाचवण्यासाठी गेलेले सहा पाकिस्तानी लष्करी जवान चकमकीत मृत्युमुखी पडले आहेत. जाफर एक्सप्रेस पाकिस्तानच्या नैऋत्य बलुचिस्तान प्रांतातील क्वेटा येथून खैबर पख्तूनख्वा येथील पेशावरला जात असताना ट्रेनवर हल्ला झाला असल्याची माहिती रॉयटर्सने दिली आहे. तसेच याबाबत एएनआईने देखील ट्विट केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी सैन्याने (Pakistani Military) कोणतीही कारवाई केल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील अशी धमकीही बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने दिली आहे. बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने असा दावा केला आहे की, त्यांनी पुर्णपणे ट्रेन ताब्यात घेतली आहे आणि 100 हून अधिक प्रवाशांना ओलीस ठेवले आहे. तर या हल्ल्यात 6 पाकिस्तानी सैनिक मारले गेल्याचे दहशतवाद्यांचे म्हणणे आहे.

बलुच लिबरेशन आर्मीने हल्लाची जबाबदारी स्वीकारली आहे. अपहरण केलेल्यांमध्ये पाकिस्तानी लष्कर, पोलिस, दहशतवादविरोधी दल (एटीएफ) आणि इंटर-सर्व्हिसेस इंटेलिजेंस (आयएसआय) चे अधिकारी होते जे पंजाबला जात होते. तर महिला, मुले आणि बलुच प्रवासींना सोडण्यात आले आहे आणि ज्यांना ओलिस ठेवले आहे ते फक्त पाकिस्तानी सुरक्षा दलाचे कर्मचारी आहेत असा दावा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने केला आहे.

ANI

आता डिजिटल पेमेंटही होणार महाग, UPI व्यवहारांवर द्यावा लागणार चार्ज ?

तर दुसरीकडे आतापर्यंत बलुचिस्तान प्रशासन आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी हल्ल्याबद्दल आणि ओलिसांच्या स्थितीबद्दल कोणतेही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube