‘स्वतःमध्ये डोकावून पाहा…’ पाकिस्तानकडून रेल्वे अपहरणाचा आरोप, भारत सरकार संतापलं

‘स्वतःमध्ये डोकावून पाहा…’ पाकिस्तानकडून रेल्वे अपहरणाचा आरोप, भारत सरकार संतापलं

Pakistan Train Hijack In Balochistan : बलुचिस्तान प्रांतात झालेल्या रेल्वे अपहरणाच्या घटनेसाठी पाकिस्तानने (Pakistan Train Hijack) भारताला (India) जबाबदार धरलंय. यानंतर आता भारताने पाकिस्तानला याबाबत चोख प्रत्युत्तर दिलंय. परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) शुक्रवारी पाकिस्तानने भारतावर लावलेले आरोप निराधार असल्याचे फेटाळून लावले. ते पुढे म्हणाले की, पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्यांसाठी स्वतःच विचार करावा.

गुरुवारी पत्रकार परिषदेत पाकिस्तानच्या परराष्ट्र कार्यालयाचे प्रवक्ते शफकत अली खान यांनी ट्रेन अपहरणासाठी अफगाणिस्तानला जबाबदार धरलंय. त्यांनी अफगाणिस्तानातून आलेल्या कॉल्सचे पुरावे सादर (Train Hijack In Balochistan) केले. दहशतवादी हल्ल्यांबाबत भारताच्या अफगाणिस्तानबद्दलच्या भूमिकेत काही बदल झाला आहे का? असx विचारले असता, त्यांनी आपली भूमिका कायम ठेवली. धोरणात कोणताही बदल झालेला नाही, असं सांगितलं. ते पुढे भारताबद्दल म्हणाले की, भारत पाकिस्तानविरुद्ध दहशतवादाला प्रोत्साहन देण्यात सहभागी आहे.

जितेंद्र आव्हाड अन् अमोल मिटकरी इतिहास संशोधक आहेत का? चुकीचा इतिहास सांगून लोकांची दिशाभूल, मनसेचा संताप

आता भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने पाकिस्तानने केलेल्या या आरोपांना चोख उत्तर दिलंय. 11 मार्चच्या हल्ल्यापासून पाकिस्तानचे लष्कर, सरकार आणि माध्यमांशी संबंधित संस्थांनी अप्रत्यक्षपणे रेल्वे हल्ल्यात भारताचा सहभाग असल्याचा आरोप केलाय. त्यांच्या सैन्य आणि गुप्तचर सेवांच्या सुरक्षेतील त्रुटींकडे दुर्लक्ष करून, त्यांनी या हल्ल्यासाठी भारताला दोष देण्याचा प्रयत्न केला.

पाकिस्तानने केलेल्या टिप्पण्यांबद्दल माध्यमांच्या प्रश्नांना उत्तर देताना, परराष्ट्र मंत्रालयाचे अधिकृत प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले की, आम्ही पाकिस्तानने लावलेले निराधार आरोप फेटाळतो. जागतिक दहशतवादाचे केंद्र कुठे आहे, हे संपूर्ण जगाला माहिती आहे. पाकिस्तानने आपल्या अंतर्गत समस्या आणि अपयशांसाठी इतरांवर बोटे दाखवण्याऐवजी आणि दोषारोप करण्याऐवजी स्वतःमध्ये डोकावून पहावे.

तुमचा कार्यकाळ औरंगजेबापेक्षा खूप खराब, शेतकऱ्यांची आत्महत्या… संजय राऊतांनी टोचले सरकारचे कान

या अपहरणासाठी पाकिस्तानने केवळ भारतालाच दोषी ठरवले नाही, तर अफगाणिस्तानलाही जबाबदार धरलंय. या संदर्भात, अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने एक निवेदन जारी करून पाकिस्तानचे दावे फेटाळून लावले. निराधार आरोप करण्याऐवजी त्यांच्या अंतर्गत सुरक्षेच्या चिंतांकडे लक्ष देण्याचे आवाहन केलंय.11 मार्च रोजी पाकिस्तानमध्ये जाफर एक्सप्रेस ट्रेनचे अपहरण झालं. तेव्हापासून पाकिस्तान सरकार भारताचे नाव न घेता दोष देत असून आपलं अपयश लपवण्याचा प्रयत्न करतंय.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube