Pakistan Blast: मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये आयईडी स्फोट, 2 ठार तर अनेक जखमी

Pakistan Blast: मोठी बातमी! पाकिस्तानमध्ये आयईडी स्फोट, 2 ठार तर अनेक जखमी

Pakistan Blast: एक मोठी बातमी समोर आली आहे. या बातमीनुसार पुन्हा पाकिस्तानमध्ये स्फोट (Pakistan Blast) झाला आहे, या स्फोटमध्ये दोन सुरक्षा रक्षक ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे तर या स्फोटमध्ये अनेक जण जखमी झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या स्फोटाचे टार्गेट पाकिस्तानी सुरक्षा अधिकारी (Pakistani security officials) होते. मात्र हा हल्ला कोणी आणि का ? केला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

माहितीनुसार, पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील खैबर पख्तूनख्वा (Khyber Pakhtunkhwa) येथे झालेल्या आयईडी स्फोटात दोन सुरक्षा कर्मचारी ठार झाले आहे आणि अनेक जण जखमी झाले आहे. अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या खैबर पख्तूनख्वाच्या बाजौर जिल्ह्यातील सालारझाई येथील मुल्ला सईद भागात शुक्रवारी रस्त्याच्या कडेला झालेल्या आयईडी स्फोटात सुरक्षा दलाच्या वाहनाला टार्गेट करण्यात आले. या स्फोटानंतर सुरक्षा दल घटनास्थळी पोहोचले असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे.

तर दुसरीकडे काही दिवसांपूर्वी देखील याच भागात आत्मघातकी हल्ला झाला होता. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला होता तर 30 जखमी होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश अल-फुरसानने (Jaish al-Fursan) स्वीकारली होती. पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीने 6 हल्लेखोरांना ठार मारले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube