Video : मोठी बातमी! पाकिस्तानात आत्मघातकी हल्ला, 12 जणांचा मृत्यू, 30 जण जखमी

Suicide Attack In Pakistan

Suicide Attack In Pakistan : एकीकडे पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 (Champions Trophy 2025) चे आयोजन करण्यात येत आहे. तर दुसरीकडे पुन्हा एकदा पाकिस्तानात (Pakistan) हल्ला झाल्याची माहिती समोर आली आहे. माहितीनुसार, पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतात (Khyber Pakhtunkhwa) आत्मघातकी हल्ला झाला आहे. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे तर 30 जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरु आहे. या हल्ल्याची जबाबदारी जैश अल-फुरसानने (Jaish al-Fursan) स्वीकारली आहे.

तर दुसरीकडे पाकिस्तानी सुरक्षा एजन्सीने 6 हल्लेखोरांना ठार मारण्याचा दावा केला आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ (PM Shahbaz Sharif) यांनी या हल्ल्याचा निषेध करत शोक व्यक्त केला आहे. तर खैबर पख्तूनख्वाचे मुख्यमंत्री अली अमीन गंडापूर (Ali Amin Gandapur) यांनी चौकशीचे आदेश दिले आहे.

माहितानुसार, 4 मार्च रोजी संध्याकाळी पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बन्नू जिल्ह्यातील एका लष्करी तळाच्या भिंतीवर दोन वाहने आदळली. या वाहनांमध्ये मोठ्या प्रमाणात स्फोटके भरलेली होती. त्यामुळे वाहन भिंतीवर आदळताच मोठा स्फोट झाला.या स्फोटांमुळे जवळच्या मशिदीचे छत कोसळले. यानंतर इतर 5 हल्लेखोरांनी लष्करी तळाच्या आवारात प्रवेश केला आणि हल्ला केला. मात्र आतापर्यंत लष्कराने कोणत्याही जीवितहानीबद्दल माहिती दिलेली नाही. पण बन्नू जिल्हा रुग्णालयातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की किमान 12 जणांचा मृत्यू झाला आहे.

आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एपीने दिलेल्या माहितीनुसार, एका अधिकाऱ्याने सांगितले की, दोन आत्मघातकी हल्लेखोरांनी लष्करी तळाच्या भिंतीजवळ स्वतःला उडवून दिले. त्यामुळे भिंत पडली त्यानंतर आणखी पाच ते सहा हल्लेखोरांनी छावणीत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ठार मारण्यात आले. माहितीनुसार, रमजानच्या सुरुवातीपासून पाकिस्तानमध्ये झालेला हा तिसरा दहशतवादी हल्ला आहे.

जैश अल-फुरसानने जबाबदारी स्वीकारली

तर दुसरीकडे या हल्ल्याची जबाबदारी जैश अल-फुरसानने स्वीकारली आहे. जैश अल-फुरसान पाकिस्तानी तालिबान दहशतवादी गटाशी संबंधित आहे. बन्नू हे खैबर पख्तूनख्वा प्रांतात आहे, जिथे हा हल्ला झाला आणि या भागात पाकिस्तानी तालिबानसारखे दहशतवादी गट येथे खूप सक्रिय आहेत.

तर या हल्ल्याबाबत पाकिस्तानी पोलिस अधिकारी जाहिद खान यांनी एपीला सांगितले की, दोन स्फोट झाले. यानंतर, हवेत धुराचे लोट उठत होते. गोळीबार सुरूच होता. या स्फोटांमुळे घरे आणि इतर इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, मृतांपैकी चार मुले होती. तो स्फोटाच्या ठिकाणाजवळ राहत होते.

ऑस्ट्रेलियावर धमाकेदार विजय, फायनलमध्ये एंट्री तरीही गंभीर टीम इंडियावर नाराज?

तर आतापर्यंत 42 लोक आमच्याकडे आले आहेत. यापैकी 12 जणांचा मृत्यू झाला असून  30 जण जखमी आहेत. त्यापैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. अशी माहिती बन्नू जिल्हा रुग्णालयाचे संचालक डॉ. अहमद फराज खान यांनी दिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube