चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ने सर्व विक्रम मोडले, जगभरात मिळाले 65.3 अब्ज लाईव्ह व्ह्यूज

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ने सर्व विक्रम मोडले, जगभरात मिळाले 65.3 अब्ज लाईव्ह व्ह्यूज

Champions Trophy 2025 : अनेक वादानंतर 19 फेब्रूवारी ते 9 मार्च दरम्यान झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ने सर्व विक्रम मोडले आहे. आयसीसीने (ICC) दिलेल्या माहितीनुसार, आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली गेलेली चॅम्पियन्स ट्रॉफी (Champions Trophy 2025) ठरली आहे. 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जागतिक स्तरावर  368 अब्ज मिनिटांनी पाहिले गेले जे 2017 मध्ये इंग्लंड आणि वेल्समध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीपेक्षा 19 टक्क्क्यांनी जास्त आहे.

आयसीसीने दिलेल्या माहितीनुसार, प्रति ओव्हर या स्पर्धेला 308 दशलक्ष प्रेक्षक मिळाले जे कोणत्याही आयसीसी स्पर्धेसाठी आतापर्यंतची सर्वाधिक आहे. अशी माहिती आयसीसीने दिली आहे. 2025 आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल या स्पर्धेतील सर्वात जास्त पाहिलेला सामना ठरला आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडचा पराभव करत या स्पर्धेचा किताब जिंकला होता. या सामन्याला ज्याला जगभरात 65.3 अब्ज मिनिटांनी लाईव्ह व्ह्यूइंग मिळाले. या सामन्याने 2017 च्या फायनलमधील विक्रम 52.1 टक्क्यांनी मोडला. अशी देखील माहिती आयसीसीने एका निवेदनात दिली आहे.

तर दुसरीकडे या स्पर्धेचा अंतिम सामना जगभरातील सर्वाधिक पाहिलेल्या आयसीसी सामन्यांमध्ये लाईव्ह वॉच टाइमच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर भारतात, हा सामना आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक 2023 च्या भारत विरुद्ध न्यूझीलंड उपांत्य फेरी आणि भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील त्याच स्पर्धेच्या अंतिम सामन्यानंतर, आतापर्यंतचा तिसरा सर्वाधिक पाहिलेला आयसीसी सामना आहे. 2017 च्या तुलनेत एकूण पाहण्याच्या तासांमध्ये 65 टक्के वाढ झाल्याने ही स्पर्धा ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक पाहिली जाणारी चॅम्पियन्स ट्रॉफी ठरली.

हिंदी भाषेतील फीडची सुरुवात करून सुधारित कव्हरेजसह, अमेझॉन प्राइम व्हिडिओने प्लॅटफॉर्मवर केवळ दाखवल्या जाणाऱ्या कोणत्याही आयसीसी स्पर्धेच्या सर्वाधिक प्रेक्षकसंख्या पाहिली. तर 2017 च्या तुलनेत 2025 च्या पाकिस्तानमधील स्पर्धेसाठी प्रेक्षकांची संख्या 24 टक्क्यांनी वाढली.

रोहित शर्मानंतर कसोटीत भारताचं नेतृत्व कोणाकडे? ‘या’ दिवशी होणार घोषणा

याबाबत आयसीसीचे अध्यक्ष जय शाह म्हणाले की, “आम्हाला हे सांगताना आनंद होत आहे की आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 ने जागतिक स्तरावर विक्रमी प्रेक्षकसंख्या मिळवली आहे, ज्यामुळे ती या स्पर्धेची आतापर्यंतची सर्वाधिक पाहिली जाणारी आवृत्ती बनली आहे. हे उल्लेखनीय आकडे खेळाचे वाढते जागतिक आकर्षण आणि आमच्या भागीदारीची ताकद दर्शवतात.”

follow us
  • fb
  • instagram
  • youtube