एका मॅचसाठी खर्च केला ८६९ कोटी अन् हाती आला भोपळा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तानवर आर्थिक संकट

एका मॅचसाठी खर्च केला ८६९ कोटी अन् हाती आला भोपळा; चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर पाकिस्तानवर आर्थिक संकट

Pakistan Cricket Board : तब्बल २९ वर्षानंतर पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या स्पर्धचे यजमानपद मिळालं. चॅम्पियन्स लीग २०२५ या स्पर्धेसाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने ( PCB) लाहोर, रावळपिंडी, कराची येथील (Cricket) स्टेडियम्सच्या नुतनीकरणारासाठी प्रचंड पैसा खर्च केला. भारतीय संघाने या स्पर्धेसाठी पाकिस्तानात जाण्यास नकार दिल्याने त्यांचे सर्व सामने दुबईत खेळवले गेले. पाकिस्तानलाही भारताविरुद्ध खेळण्यासाठी दुबईत जावं लागलं. त्यामुळे त्यांनी खूप रडारड केली. परंतु, आता स्पर्धा संपल्यानंतर त्यांच्यावर खरंच रडण्याची वेळ आली आहे.

पाकिस्तानने या स्पर्धेसाठी जवळपास १०० मीलियनपेक्षा जास्त रक्कम खर्च केली आणि त्यांना गद्दाफी स्टेडियमवर खेळवला गेलेला न्यूझीलंडविरुद्धचा सामना ८६९ कोटींचा पडला आहे. TelegraphIndia ने दिलेल्या वृत्तानुसार PCBने स्टेडियम नुतनीकरणणासाठी तब्बल १८ अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च केले, जे अंदाजीत खर्चापेक्षा ५०% अधिक झाले. याशिवाय स्पर्धेच्या तयारीसाठी आणखी $४० दशलक्ष खर्च करण्यात आला. एवढा प्रचंड खर्च केल्यानंतर PCB ला फक्त $६ दशलक्ष होस्टिंग फी आणि तिकीट विक्री व प्रायोजकत्वातून थोडी रक्कम मिळाली. म्हणजे ५२ कोटीच त्यांना मिळाले. त्यांना ७०० कोटींहून अधिक आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे.

मोठी बातमी! पाकिस्तान सैन्याच्या 8 बसेसवर BLA चा मोठा हल्ला; तब्बल 90 सैनिक ठार

PCB च्या या आर्थिक तोट्यामुळे पाकिस्तान क्रिकेटच्या भविष्यासाठी मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या PCB साठी हा धक्का आणखी मोठा असल्याचे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे. पाकिस्तानचा संघ घरच्या मैदानावर फक्त एकच सामना खेळला आणि न्यूझीलंडविरुद्धच्या त्या सामन्यासाठी ८६९ कोटी खर्च झाला. रावळपिंडी येथील सामना पावसामुळे रद्द झाला. पाकिस्तानात १० सामने होणार होते, परंतु पाच सामने पावसामुळे झाले नाही.

हे आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने खेळाडूंच्या परागात कपात केली. पाकिस्तानी वृत्तपत्रांच्या बातम्यांनुसार PCB ने त्यांच्या खेळाडूंची मॅच फी ४० हजाराहून १० हजार इतकी कमी केली. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी या प्रकरणात लक्ष घालून देशांतर्गत क्रिकेट बोर्डांना काही सुचना केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube