रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही मोठी घोषणा; T20 International cricketमधून निवृत्ती

  • Written By: Published:
रोहित-विराट पाठोपाठ रवींद्र जडेजाचाही मोठी घोषणा; T20 International cricketमधून निवृत्ती

Ravindra Jadeja Retirement from T20 International cricket: टी-20 वर्ल्डकपवर नाव कोरल्यानंतर टीम इंडियाचे दिग्गज खेळाडू हे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून ( T20 International cricket) निवृत्ती जाहीर करत आहेत. विश्वचषक जिंकल्यानंतर लगेच माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) व कर्णधार रोहित शर्माने निवृत्तीची घोषणा केलीय. आता अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja) यानेही टी-20 आंतराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे.


संभाजी भिडेंचं वटसावित्रीबद्दल वादग्रस्त विधान, म्हणाले, ‘अभिनेत्री अन् ड्रेस घातलेल्या महिलांनी…’


रवींद्र जडेजा याने इंस्टाग्रामवर एक भावूक मेसेज लिहित निवृत्ती जाहीर केलीय. मी आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून संन्यास घेत आहे. अभिमानाने भक्कम घोड्याप्रमाणे, मी नेहमीच माझ्या देशासाठी माझे सर्वोत्तम दिले आहे. यासोबतच जडेजाने इतर फॉरमॅटवरही मोठे विधान केले आहे. मी वनडे आणि कसोटी खेळत राहील, असे जडेजानेही म्हटले आहे.

T20 World Cup : वॉर्नरचा गुडबाय; ‘या’ दिग्गज खेळाडूंनाही क्रिकेट निवृत्तीचे वेध

रवींद्र जडेजाचीही टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरी चांगली झाली आहे. 2009 मध्ये तो श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना खेळला होता. अष्टपैलू रवींद्र जडेजाने 75 सामन्यात 515 धावा केल्या आहेत. तर 54 विकेट घेतल्या आहेत. त्याचे सर्वात्कृष्ट प्रदर्शन इंग्लंडविरुद्ध झाले आहे.त्याने 29 चंडूत 46 धावा करत संघाला विजयी केले होते. तर सर्वात्कृष्ट गोलंदाजी 2021 ची 20 वर्ल्डकपमध्ये स्कॉटलंडविरुद्ध केली होती. या सामन्यात त्याने तीन विकेट घेतल्या होत्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज