IND vs ENG : रविचंद्रन अश्विन अन् रवींद्र जडेजानं रचला इतिहास, ‘या’ फिरकीपटूंच्या नावावर अनोखा विक्रम…

IND vs ENG : रविचंद्रन अश्विन अन् रवींद्र जडेजानं रचला इतिहास, ‘या’ फिरकीपटूंच्या नावावर अनोखा विक्रम…

Ravindra Jadeja And Ravichandran Ashwin : भारताचे स्टार फिरकीपटू रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin)आणि रवींद्र जडेजा (Ravindra Jadeja)यांनी हैदराबादमध्ये एकत्र इतिहास रचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या (England)पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी या दोघांनीही आपले नाव रेकॉर्ड बुकमध्ये नोंदवले. हैदराबादमध्ये (Hyderabad)इंग्लंडविरुद्ध खेळवल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी अश्विन आणि जडेजा या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेऊन एक ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Maratha reservation : आझाद मैदान नाही; जरांगेंना आंदोलनासाठी मुंबईबाहेरच दिला पर्याय

रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा या दोघांनी प्रत्येकी तीन बळी घेतल्यानंतर अश्विन आणि जडेजा ही आता भारतासाठी सर्वाधिक विकेट घेणारी फिरकीपटूंची जोडी बनली आहे. या जोडीच्या नावाने आता अनिल कुंबळे (Anil Kumble)आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh)या दिग्गज फिरकी जोडीलाही मागे टाकलं आहे. अश्विन आणि जडेजाने प्रत्येकी 505 बळी घेत इंग्लंडला सामन्यात बॅकफूटवर टाकलं आहे.

‘आम्हाला मुंबईला जाण्याची हौस नाही पण, CM अन् दोन उपमुख्यमंत्र्यांनी’.. जरांगेंनी काय सांगतिलं ?

यापू्र्वी अनिल कुंबळे आणि हरभजन सिंग या जोडीने भारताकडून कसोटीत 501 बळी घेतले. सर्वाधिक विकेट्स घेण्याचा सध्याचा विक्रम इंग्लंडचे वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड यांच्या नावावर आहे. दोघांनी 138 कसोटी सामन्यात 1039 विकेट घेतल्या आहेत. ब्रॉड निवृत्त झाला असला तरी, सध्याच्या खेळाडूंमध्ये मिचेल स्टार्क आणि नॅथन लायन ही जोडी आघाडीवर आहे, त्यांनी 81 कसोटी सामन्यांमध्ये 643 विकेट घेतल्या आहेत.

आता भारतीय फिरकीपटूंनी इंग्लंडची ‘बेसबॉल’ रणनीती निष्क्रीय करुन रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी पहिल्या सत्रात शानदार गोलंदाजी केली. इंग्लंडचे सलामीवीर बेन डकेट आणि जॅक क्रॉलीने 55 धावा केल्या होत्या. अश्विनने 12 व्या षटकात डकेटला एलबीडब्ल्यू बाद करून भारताला पहिले यश मिळवून दिले.

डकेटने 39 चेंडूंत सात चौकारांच्या मदतीने 35 धावा केल्या. यासह पहिल्या विकेटसाठी 55 धावांची भागीदारी तोडली. अश्विनचा हा 11वा चेंडू होता, त्यानंतर 14व्या षटकात जडेजाने पहिल्या स्लिपमध्ये ऑली पोपला कर्णधार रोहित शर्माकडे झेलबाद केले.

अश्विनने पुढील षटकात क्रॉलीला आपला 492 वा कसोटी बळी बनवला, त्याच्या फुल लेन्थ चेंडूवर क्रॉलीला मोहम्मद सिराजने झेलबाद केले. यानंतर नियमित अंतराने इंग्लंडच्या विकेट पडत राहिल्या. बेन स्टोक्स सध्या 43 धावा करून नाबाद आहे. चहापानाच्या सत्रापर्यंत इंग्लंडने आठ गडी गमावून 215 धावा केल्या आहेत.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज