Maratha reservation : आझाद मैदान नाही; जरांगेंना आंदोलनासाठी मुंबईबाहेरच दिला पर्याय
Maratha reservation : मराठा आरक्षणाच्या (Maratha reservation) प्रश्नावर अद्यापही तोडगा निघाली नाही. दरम्यान, आता मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) हे मुंबईतील आझाद मैदानावर (Azad Maidan) आमरण उपोषण करणार आहेत. ते अवघ्या काही तासांत मुंबईत दाखल होणार आहे. मात्र, तत्पूर्वीच मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाची परवानगी पोलिसांनी नाकारली आहे. आंदोलनासाठी राखीव असलेल्या आझाद मैदानाची इतकी क्षमता नसल्याचं पोलिसांनी सांगितंल आहे.
Pune गुन्हे शाखेची मोठी कारवाई; बाणेरमध्ये बड्या हॉटेलांमधून 11 महिलांची सुटका
पोलिसांनी मनोज जरांगे यांना उपोषणासाठी नवी मुंबईतील खारघर येथील सेक्टर २९ मधील इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क मैदान सुचवले आहे. पोलिसांना याबाबत रितसर पत्र मनोज जरांगे पाटील यांनी लिहिलं आहे.
पोलिसांच्या पत्रात काय?
पोलिसांनी आपल्या पत्रात लिहिलं की, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून मुंबईत विविध वित्तीय संस्था, आंतरराष्ट्रीय वकालती व इतर वित्तीय केंद्रे कार्यरत आहेत. मुंबईत दररोज सुमारे 60 ते 65 लाख नागरिक रेल्वे आणि इतर वाहतुकीच्या मार्गांनी नोकरीसाठी प्रवास करतात. सकल मराठा समाजाचे आंदोलक हे प्रचंड मोठ्या वाहन संख्येसह मुंबईत आल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊन मुंबईची दैनंदिन वाहतुक व्यवस्था कोलमडणार आहे.
Mrunmayi Deshpande : अभिनेत्री मृण्मयी देशपांडेचा साडीतील सुंदर-सोज्वळ लूक
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आझाद मैदानाचे केवळ ७ हजार चौरस मीटर क्षेत्र आंदोलनासाठी राखीव ठेवण्यात आली आहे. त्याची क्षमता 5000 ते 6000 आंदोलकांची सामावून घेण्याएवढीच आहे. मात्र मोठ्या संख्येने आंदोलक तेथे आल्यास त्यांना मैदानात राहण्यासाठी पुरेशी जागा आणि सुविधा उपलब्ध होणार नाहीत. तसेच, मैदानाचा उर्वरित भाग क्रीडा विभागाच्या अखत्यारीत आहे असून शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई यांचे पत्र क्रमांक मैदान 3024/प्र.क. 12/2024/कीयुसे -1, दि. 24.01.2024 अन्वये तेथे आंदोलनासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.
आपण लाखोंच्या संख्येने आंदोलक आणि वाहनांसह मुंबईत येणार असल्याचे घोषित केले आहे, त्यामुळे मुंबईतील दैनंदिन जनजीवन विस्कळीत होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची दाट शक्यता आहे.
मुंबईची भौगोलिक स्थिती, लोकसंख्या, वाहनांची संख्या, अरुंद रस्ते, उपलब्ध नसलेले पर्यायी रस्ते, खोळंबणारी वैद्यकीय सोयीसुविधा, त्यामुळं होणारी रुग्णांची हेळसांड व इतर अत्यावश्यक सेवांवर होणार प्रभाव पाहता मुंबईतील एकूण सार्वजिनक सुव्यवस्थेवर विपरित परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे, आपण वारंवार म्हटल्याप्रमाणे, हे आंदोलन प्रचंड संख्येचे असून मुंबईमधील कोणत्याही मैदानामध्ये एवढ्या प्रचंड मोठ्या संख्येच्या आंदोलकांना सामावून घेण्याची क्षमता नाही. सदरचे आंदोलन हे अनिश्चित काळासाठी असल्याने त्यासाठी आवश्यक सोयी सुविधा दीर्घकाळासाठी मुंबईमध्ये पुरवणे शक्य होणार नाही. व त्याचा परिणाम सार्वजनिक आरोग्य व इतर नागरी सुविधांवर होणार आहे.
उच्च न्यायालय, मुंबई यांनी आम्हाला आंदोलनासाठी योग्य जागा आपणास कळण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्याअर्थी आपणास शांततामय मार्गाने आंदोलन करण्यासाठी इंटरनॅशनल कॉर्पोरेशन पार्क ग्राउंड, सेंटर पार्क जवळ, सेक्टर 29, खारघर, नवी मुंबई हेच मैदान संयुक्तिक राहिलं. तरी सदर ठिकाणी आंदोलन करण्याकरता आपण संबंधित प्राधिकरणाकडे अर्ज करून रितसर परवानगी घ्यावी, असंही पोलिसांनी सुचववं.
सर्वोच्च न्यायालयाने व विधी उच्च न्यायालये यांनी वेळोवेळी निर्गमित केलेल्या इतर न्याय निर्णयांमध्ये आंदोलन कर्त्यांसाठी दिलेले निर्देश यांचे तंतोतंत अनुपालन आपण रस्त्यावर व सार्वजनिक ठिकाणांवर कऱणे अनिवार्य आहे. त्याचे अनुपालन न केल्यास सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालय यांची अवमानना होईल याची आपण नोंद घ्यावी.