संभाजी भिडेंचं वटसावित्रीबद्दल वादग्रस्त विधान, म्हणाले, ‘अभिनेत्री अन् ड्रेस घातलेल्या महिलांनी…’

संभाजी भिडेंचं वटसावित्रीबद्दल वादग्रस्त विधान, म्हणाले, ‘अभिनेत्री अन् ड्रेस घातलेल्या महिलांनी…’

Sambhaji Bhide : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे सतत चर्चेत असणारे  प्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी आता आणखी एक वादग्रस्त विधान केलं आहे. वटसावित्रीच्या (Vatsavitri) पूजेला अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये, तेथे फक्त साडी घातलेल्या महिलांनीच जावं, असं वक्तव्य भिडेंनी केलं. त्यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘पक्षप्रवेशाला आता मुहूर्त काढायचा का?’, गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला

आज पुण्यात बोलताना संभाजी भिडे म्हणाले की, आपल्याला वारकरी-धारकरी संगम हा कार्यक्रम करायचा आहे. रायगडावर सुवर्ण सिंहासन करायचं आहे. कुत्र्याला लांबचं ऐकायलं येतचं. वटवाघळाला येतं. त्याचबरोबर गोमाता, भारतमाता, वेदमाता सारख्या सात मातांच्या रक्षणसााठी वाटेल ते करायला तयार असणं म्हणजे हिंदवी स्वराज्य व्रत होय. ह्या व्रताची काही पथ्य आहे. त्यामुळंच वटसावित्रीच्या पूजेला अभिनेत्री आणि ड्रेस घातलेल्या महिलानी जाऊ नये, तेथे फक्त साडी घातलेल्या महिलांनीचं जावं, असं वक्तव्य भिडेंनी केलं.

मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक, पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड, आजच स्वीकारणार पदभार 

दळभद्री स्वातंत्र्य मिळालं…

पुढं बोलताना भिडे म्हणाले, ज्यांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली होती. अशा 10-10 हजारांच्या तुकड्या दररोज रायगडला जाणार आहेत. प्रत्येक तालुक्यात 10 हजारांची तुकडी तयार करायची आहे. संपूर्ण देशात हिंदवी स्वराज्याचं व्रत घेतलेली लोक आपल्याला तयार करायची आहेत. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळालं ते हांडगं स्वातंत्र्य आहे आणि दळभद्री स्वातंत्र्य आहे. हिंदवी स्वराज्य हे खरं स्वातंत्र्य आहे, असंही संभाजी भिडे म्हणाले.

दरम्यान, भिडेंच्या या वादग्रस्त वक्तव्यापूर्वीच पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे. आज पालखीला मानवंदाना करताना कायदा व सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घ्या. तेढ निर्माण करणारी भाषणे करू नका, अशा सूचना पुणे पोलिसांनी संभाजी भिडे यांना दिल्यात मात्र, आता भिडे यांनी पोलिसांच्या नोटिशीकडे दुर्लक्ष करत आता नवा वाद निर्माण केला.

यापूर्वीही केले वादग्रस्त वक्तव्य…
संभाजी भिडेंनी गतवर्षी अमरावतीत बोलतांना महात्मा गांधींबाबतही वादग्रस्त विधान केले होते. त्या वेळी भिडे म्हणाले होते की, महात्मा गांधी हे मोहनदास करमचंद गांधी म्हणून ओळखले जातात, पण करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नव्हते, तर एक मुस्लिम जमीनदार त्यांचे वडील होते, असा दावा त्यांनी केला होता.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज