‘पक्षप्रवेशाला आता मुहूर्त काढायचा का?’, गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला

‘पक्षप्रवेशाला आता मुहूर्त काढायचा का?’, गिरीश महाजनांचा खडसेंना खोचक टोला

Girish Mahajan On Eknath Khadse : भाजपातून राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शरद पवार गटात गेलेल्या एकनाथ खडसेंनी (Eknath Khadse) काही दिवसांपूर्वी आपण पुन्हा भाजपमध्ये (BJP) येणार असल्याचं जाहीर केलं होतं. त्यांच्या या घोषणेला आता अनेक दिवस लोटले, तरीही अद्याप त्यांचा भापजात प्रवेश झाला नाही. यावरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी एकनाथ खडसेंना जोरदार टोला लगावला. उशीर कशाला करताय? आता काय मुहूर्त काढायचा का? असा टोला महाजन यांनी लगावला.

मुख्य सचिवपदी सुजाता सौनिक, पहिल्यांदाच महिला अधिकाऱ्याची निवड, आजच स्वीकारणार पदभार 

गिरीश महाजन यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलतांना त्यांनी अनेक विषयावर भाष्य केलं. यावेळी त्यांना एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाबाबत विचारले असता ते म्हणाले, एकनाथ खडसे हे मोठे नेते आहेत. ते थेट दिल्लीत बोलतात, असा टोला महाजन यांनी लगावला.

तनपुरे कारखाना बंद पाडणारे पडद्यामागचे सूत्रधार तेच; विखे-कर्डिलेंवर तनपुरेंचे गंभीर आरोप 

देवेंद्र फडणवीस यांनीही एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला संमती दिल्याचं बोललं जात आहे, असं विचारलं असता महाजन म्हणाले की, मग चांगलं आहे ना? उशीर कशाला करता? आता काय मुहूर्त काढायचा का? तुम्हीच तारखा देत आहात… आम्ही कुठं काय म्हणत आहोत. तुमचीच तारीख पे तारीख चालली. निवडणुकीच्या आधी येतो, नंतर येतो, आता या लवकर, असा टोला महाजन यांनी लगावला.

खडसेंनी दुटप्पी भूमिका घेऊ नये…
अर्थमंत्री अजित पवारांनी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा केल्या. यावरून एकनाथ खडसेंनी महायुतीवर जोरदार टीका केली होती. अर्थसंकल्प चांगला आहे, मात्र घोषणांची अंमलबजावणी होईल की नाही? याची शंका आहे, अशी टीका खडसेंनी केली. यावर बोलतांना महाजन म्हणाले, एकनाथ खडसे यांनी अधिवेशनात बोलावे. बाहेर अशा पध्दतीने बोलू नये. पक्षात यायची घाई आहे. मला संमती दिलेली आहे, असं म्हणायचं. मात्र, दुसरीकडे पक्षावर टीका करायची अशी दुटप्पी भूमिका त्यांनी घेऊ नये, असं महाजन म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज