तनपुरे कारखाना बंद पाडणारे पडद्यामागचे सूत्रधार तेच; विखे-कर्डिलेंवर तनपुरेंचे गंभीर आरोप
Prajakt Tanpure Criticize Sujay Vikhe and Shivaji Kardile : अहमदनगर जिल्ह्यातील राहुरीतील तनपुरे सहकारी साखर कारखाना बंद पाडण्यास जबाबदार राहिलेल्या राजकारणावरून राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure ) यांनी जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष आणि भाजपचे माजी आमदार शिवाजी कर्डीले (Shivaji Kardile) यांच्यासह सुजय विखेंवर (Sujay Vikhe) गंभीर आरोप केले आहेत. विधानसभेचं अधिवेशन सुरू आहे. (Budget) नुकताच अर्थसंकल्प सादर झाला. मात्र, त्यामध्ये विरोधी पक्षाच्या आमदारांना निधी देण्यात आला नसल्याचंही तनपुरे म्हणाले आहेत.
‘विधानसभा लढण्याची माझी तयारी, खडकवासल्यातून…’; रुपाली चाकणकरांचे मोठं विधान
यावेळी बोलताना तनपुरे म्हणाले की, तनपुरे कारखाना हा जेव्हा विखेंच्या ताब्यात होता. तेव्हा आम्ही सहकार्याची भावना ठेवली. तसेच आमच्या पाहुण्यांचा प्रसाद शुगर कारखान्याच्या उसावर विखेंच्या ताब्यात असताना तनपुरे कारखाना चालला. पण शिवाजी कर्डिले यांनी पडद्याआडून सातत्याने राजकारण केलं.
“भारताने वर्ल्डकप जिंकला, आम्ही विधानसभा जिंकणार”; मंत्री विखेंना फुल कॉन्फिडन्स
कारखान्यावर आमची सत्ता आल्यानंतर बँकेकडून कर्ज नाकारला गेलं. मात्र त्यांची सत्ता असताना नियम डावलून कर्ज दिले गेले. त्यामुळे राहुरी कारखान्याची ही अवस्था करण्यासाठी पडद्यामागचे सूत्रधार हे शिवाजी कर्डिले आहेत. तर आमच्या ताब्यात कारखाना आल्यानंतर तो अत्यंत खिळखिळ्या अवस्थेत होता.
त्यामुळे कावळा बसायला आणि फांदी तुटायला असं झालं. हा कारखाना बंद पडायला शिवाजी कर्डिले हे जबाबदार आहेत. असा गंभीर आरोप प्राजक्त तनपुरे यांनी केला. त्यामुळे ते अजित पवार यांना कशासाठी भेटले माहित नाही पण या कारखान्याला पुन्हा चालू करण्यासाठी जो कोणी हातभार लागेल त्याला आम्ही काय मदत करू. असेही यावेळी तनपुरे म्हणाले.
दरम्यान राहुरी येथील तनपुरे सहकारी साखर कारखान्यावर अहमदनगर जिल्हा बँकेचे कोट्यावधीचे कर्ज थकीत होत. याच दरम्यान खासदार सुजय विखे पाटील यांनी या कारखान्यात निवडणुका जिंकून कारखाना चालवायला घेतला होता. मात्र त्यांना अपयश आलं आणि कारखाना पुन्हा बंद पडला. सध्या 130 कोटी रुपयांचं कर्ज असलेल्या या कारखान्याला चालवण्यासाठी पुन्हा टेंडर काढण्यात येणार आहे. या चर्चा सुरू असतानाच अहमदनगर जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले यांनी राज्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्याने हा कारखाना अजित पवार चालवायला घेणार असल्याचे चर्चा सुरू झाल्या.