“भारताने वर्ल्डकप जिंकला, आम्ही विधानसभा जिंकणार”; मंत्री विखेंना फुल कॉन्फिडन्स

“भारताने वर्ल्डकप जिंकला, आम्ही विधानसभा जिंकणार”; मंत्री विखेंना फुल कॉन्फिडन्स

Radhakrishna Vikhe Congratulate Team India for T 20 World Cup Victory : टी 20 विश्वचषकाच्या अंतिम आणि थरारक (T20 World Cup) सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत विश्वचषकावर (IND vs SA Final) नाव कोरलं. टीम इंडियाच्या या (Team India) अभिमानास्पद कामगिरीचं सर्व स्तरातून कौतुक आणि अभिनंदन होत आहे. सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींप्रमाणेच राजकीय नेते मंडळीही आनंदीत झाले आहेत. आज राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे (Radhakrishna Vikhe) पाटील यांनीही भारतीय संघाचं अभिनंदन केलं. तसेच भारताने जसा वर्ल्डकप जिंकला आता आम्ही विधानसभा निवडणूक जिंकणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टी 20 विश्वचषक जिंकल्याबद्दल मी भारतीय संघांचे मनापासून अभिनंदन करतो. संघातील सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो. ज्या पद्धतीने भारतीय संघाने टी 20 विश्वकप (Team India) जिंकला त्याच पद्धतीने आता महायुती राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकणार आहे. याआधी दोन विश्वचषक स्पर्धेत भारताला विजयी होता आलं नव्हतं. पण आताचा विश्वकप जिंकत त्या पराभवांवर फुंकर घालण्याचं काम भारतीय संघानं केलं आहे. आता याच पद्धतीने आगामी विधानसभा निवडणुकीची मॅच महायुती जिंकणार आहे. त्यासाठी आम्ही आतापासूनच आघाडीवर आहोत असे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.

“चिंता वाटली पण, भारताचा अद्भूत चमत्कार” शरद पवारांची खेळाडूंना कौतुकाची थाप

दरम्यान, दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकण्यासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 16 धावा हव्या होत्या. अर्शदीप सिंह (Arshadeep Singh) आणि जसप्रित बुमराहच्या चार-चार ओव्हर टाकून झाल्या होत्या. त्यामुळे शेवटची ओव्हर हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) देण्यात आली. या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हार्दिकने डेव्हिड मिलरला तंबूत धाडलं. यानंतरही हार्दिक पांड्याने चिवट गोलंदाजी करत फक्त 8 धावा दिल्या आणि टीम इंडियाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज