T20 World Cup : वॉर्नरचा गुडबाय; ‘या’ दिग्गज खेळाडूंनाही क्रिकेट निवृत्तीचे वेध

T20 World Cup : वॉर्नरचा गुडबाय; ‘या’ दिग्गज खेळाडूंनाही क्रिकेट निवृत्तीचे वेध

T20 World Cup 2024 : टी 20 विश्वचषकात टीम इंडियाने मागील (T20 World Cup 2024) वर्ल्डकपमधील पराभवाचा वचपा काढत ऑस्ट्रेलिया संघाचा (IND vs AUS) पराभव केला. यानंतर अफगाणिस्तानने बांगलादेशचा (AFG vs BAN) पराभव करत सेमी फायनलमध्ये पोहोचण्याची ऑस्ट्रेलियाची उरलीसुरली आशाही मावळून टाकली. यानंतर ऑस्ट्रेलिया संघावर माजी खेळाडू टीका करत असतानाच संघातील धडाकेबाज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने आंतरराष्ट्रीय (David Warner) क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.

वॉर्नरने त्याचा अखेरचा टी 20 सामना टीम इंडियाविरुद्ध (Team India) खेळला. या सामन्यात त्याला फक्त सहा रन करता आले. यानंतर आता आणखीही काही खेळाडूंच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. क्रिकेटमधील आणखी कोणते खेळाडू लवकरच निवृत्ती जाहीर करू शकतात याची माहिती घेऊ या.

अफगाणिस्तानने बांग्लादेशला लोळवलं, सेमी फायनलमध्ये धडक; ऑस्ट्रेलियाचं पॅकअप

रोहित शर्मा

टीम इंडियाचा हिट मॅन म्हणून ओळखला जाणारा कर्णधार रोहित शर्मा लवकरच (Rohit Sharma) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो. कदाचित हा टी 20 वर्ल्डकप त्याच्यासाठी अखेरचा ठरू शकतो. आगामी काळात 37 वर्षीय रोहित शर्मा क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करू शकतो अशी चर्चा आहे. सन 2007 मध्ये रोहितने टी 20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. आतापर्यंत त्याने 157 टी 20 सामने खेळले असून 4165 धावा केल्या आहेत.

विराट कोहली

टीम इंडियाचा स्टार फलंदाज विराट कोहली सुद्धा (Virat Kohli) या विश्वचषकानंतर निवृत्ती जाहीर करू शकतो. तसे घडल्यास आश्चर्य वाटण्याचे काहीच कारण नाही. क्रिकेटच्या या फॉरमॅटमध्ये विराटने 2010 मध्ये पदार्पण केले होते. 35 वर्षांच्या विराटने आतापर्यंत 123 टी 20 सामन्यात 4100 धावा केल्या आहेत. मध्यंतरी त्याच्या क्रिकेट निवृत्तीच्या बऱ्याच चर्चा सुरू होत्या. या विश्वचषकातही विराट काहीच विशेष करू शकला नाही.

पावसाचं सावट, राखीव दिवसही नाही; भारत-इंग्लंड सामन्याचं टायमिंगही अजब

आंद्रे रसेल

वेस्ट इंडीजचा धडाकेबाज अष्टपैलू (West Indies) खेळाडू आंद्रे रसेलही क्रिकेटमधून निवृत्त होण्याच्या मार्गावर आहे. 2026 मध्ये होणाऱ्या वन डे विश्वचषक स्पर्धेत कदाचित तो नसेल. टी 20 विश्वचषकात सुपर 8 फेरीतच विंडीजचे आव्हान संपुष्टात आले. यानंतर आता आंद्रे रसेल वन डे क्रिकेटप्रमाणेच टी 20 पासूनही दूर जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नामिबिया संघाचा अष्टपैलू खेळाडू डेव्हिड विजे आणि नेदरलँड्सचा फलंदाज साइब्रँड एंजेलब्रेच या दोघांनी टी 20 विश्वचषका दरम्यानच शेवटचा टी 20 सामना खेळला. तसेच न्युझीलंड संघाचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने (Trent Bolt) कन्फर्म केले आहे की आता टी 20 वर्ल्डकपमध्ये खेळणार नाही. या विश्वचषकात न्यूझीलंडची कामगिरी अतिशय निराशाजनक राहिली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube