भारत इंग्लंड सामना रद्द झाला तर फायनलमध्ये कोण? ‘या’ संघाची एन्ट्री पक्की..
IND vs ENG Semi Final : टी 20 विश्वचषकात भारत आणि इंग्लंड यांच्यात (IND vs ENG Semi Final) दुसरा सेमीफायनल सामना खेळला जाणार आहे. मात्र हा सामना सुरू होण्याआधीच गयानात जोरदार पाऊस होत आहे. त्यामुळे या सामन्याच्या भवितव्यावर (T20 World Cup 2024) प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना उद्या सायंकाळी सुरू होणार आहे. पण तोपर्यंत जर पावसाने उघडीप दिली नाही किंवा सामना सुरू झाल्यानंतर पाऊस आला आणि या पावसामुळे सामना रद्द करावा लागला तर पुढं काय होईल याची माहिती घेऊ या.
या सामन्यासाठी टीम इंडिया पूर्णपणे (Team India) तयार आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत शानदार प्रदर्शन केले आहे. एकही सामना गमावलेला नाही. गतविजेत्या ऑस्ट्रेलियाला धूळ चारत मागील वर्ल्डकपमधील पराभवाची परतफेडही केली आहे. आता सेमी फायनलमध्ये इंग्लंडविरुद्ध खेळण्यास भारताचे खेळाडू सज्ज झाले आहेत. या सामन्यात इंग्लंडसारखा (England) चांगला संघ समोर आहे त्यामुळे टक्कर जोरदार राहिल. सामन्यातील नियमांचा विचार केला तर या सामन्यासाठी राखीव दिवस ठेवलेला नाही. अशा परिस्थितीत जर पाऊस आला आणि सामना रद्द करण्याची वेळ आलीच तर याचा फायदा भारतालाच होणार आहे.
भारताने याआधीचे सर्व सामने जिंकले आहेत. सुपर 8 मधीलही सर्व सामने जिंकले आहेत. इंग्लंडने सुपर 8 मध्ये चार सामने खेळले होते त्यातील 2 सामने जिंकले होते तर एका सामन्यात पराभव झाला होता. पहिला सेमी फायनल सामना अफगाणिस्तान आणि दक्षिण आफ्रिका (AFG vs RSA) यांच्यात होणार आहे. या सामन्यासाठी मात्र राखीव दिवस ठेवण्यात आला आहे.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यासाठी मात्र राखीव दिवस नाही. जर या सामन्यात पाऊस आला तर काही अतिरिक्त वेळ आहे. या सामन्यासाठी 250 मिनिट अतिरिक्त आहेत. पहिल्या सेमीफायनलसाठी मात्र 60 मिनिटांचा एक्स्ट्रा टाइम आहे. तसेच या सामन्यासाठी राखीव दिवसही आहे.
..तर टीम इंडियाची फायनल पक्की
भारत आणि इंग्लंड सामना पावसामुळे रद्द झाला तर टीम इंडियाला मोठा फायदा होणार आहे. भारतीय संघ थेट फायनलमध्ये एन्ट्री घेईल. नियमानुसार दुसऱ्या सेमीफायनलसाठी राखीव दिवस नाही. याच कारणामुळे गुणतालिकेत टॉपवर असणारा संघ थेट अंतिम सामन्यात एन्ट्री घेईल. टीम इंडिया सुपर 8 मधील ग्रुप एकमधील गुणतालिकेत पहिल्या क्रमांकावर आहे.
IND vs ENG : कुलदीप-अश्विनच्या घातक गोलंदाजीपुढं इंग्लंडचं लोटांगण, 218 धावांवर संघ तंबूत