IND Vs ENG : साहेबांचा पराभव; टीम इंडियाने बदलला 112 वर्षांपूर्वाचा इतिहास; कसोटी मालिका 4-1 ने जिंकली

  • Written By: Published:
Letsupp Image   2024 03 09T142118.643

India Beat England In Dharamsala Test : रोहित शर्मा आणि शुभमन गिलच्या शतकांनंतर रविचंद्रन अश्विनच्या शानदार गोलंदाजीच्या जोरावर भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडचा 64 धावांनी पराभव केला आहे. भारताच्या  या विजयामुळे टीम इंडियाने 112 वर्षांपूर्वीचा इतिहासही बदलला आहे. धरमशाला येथील एचपीसीए स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि शेवटच्या कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी (दि.9) भारताने इंग्लंडचा एक डाव आणि 64 धावांनी पराभूत केले. भारताने दुसऱ्या डावात इंग्लंडला 195 धावांत गुंडाळत ही मालिका 4-1 ने जिंकली. टीम इंडियाचा हा विजय खूप ऐतिहासिक असा आहे, कारण कसोटी क्रिकेटमध्ये 112 वर्षांनंतर पहिल्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर संघाने 4-1 अशा फरकाने पाच सामन्यांची कसोटी मालिका जिंकली आहे.

क्रिकेटच्या दादाची राजकारणात एन्ट्री? टीएमसीच्या तिकिटावर लोकसभा लढवणार

इंग्लंडी टॉप फळी पुन्हा ठरली फेल

इंग्लंडकडून दुसऱ्या डावात जो रूटने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 84 धावांची चांगली खेळी केली. पण इंग्लंड संघाची टॉप ऑर्डर पुन्हा सपशेल फसल्याचे दिसून आले. सलामीवीर जॅक क्रोली एकही धाव न काढता रवी अश्विनच्या चेंडूवर बाद झाला. तर, बेन डकेट 2 धावा करून तंबूत परतला. याशिवाय ओली पोप 19 तर, जॉनी बेअरस्टोने 39 धावांची छोटी पण चांगली खेळी खेळी केली. साहेबांच्या संघाचा कर्णधार बेन स्टोक्स अवघ्या दोन धावा करून तंबूत परताला.

रोहित शर्मा आणि शुभमन गिलची शतकी खेळी

भारतीय संघाने पहिल्या डावात 477 धावा केल्या. यामुळे भारताला 259 धावांची मोठी आघाडी मिळाली. भारताकडून रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी शतके झळकावली. रोहित शर्माने 103 तर, शुभमन गिलने 110 धावांचे योगदान दिले. याशिवाय देवदत्त पडिकल आणि सरफराज खान यांनी अर्धशतक केली.

T20 WORLD CUP: भारत-पाकिस्तान महामुकाबला, एका तिकिटासाठी मोजावे लागतायत 1.86 कोटी

शंभराव्या कसोटी चमकला अश्वीन 

शंभरावी कसोटी खेळणाऱ्या रविचंद्रन अश्विनची कामगिरी उत्कृष्ट ठरली त्याने पहिल्या डावात चार आणि दुसऱ्या डावात पाच बळी घेतले. पहिल्या डावात इंग्लंडकडून चार बळी घेणाऱ्या अश्विनने दुसऱ्या डावात पाच बळी घेतले, कसोटी मालिकेत असा विक्रम करणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरला आहे. अश्वीनच्या या कामगिरीमुळे त्याने भाजतीय संघाचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेलाही पिछाडीवर टाकले आहे. अश्वीनने 36 व्यांदा एका डावात पाच विकेट्स घेतल्या असून, कुंबळेने 35 वेळा अशी कामगिरी केली आहे.

follow us