ऑस्ट्रेलियाचा वैरी अन् T20 मधला मास्टर; अफगाणिस्तानच्या विजयाचे मैदानाबाहेरचे हिरो

ऑस्ट्रेलियाचा वैरी अन् T20 मधला मास्टर; अफगाणिस्तानच्या विजयाचे मैदानाबाहेरचे हिरो

AUS vs AFG : टी 20 विश्वचषकामध्ये आज अफगाणिस्तानच्या संघाने अगदी अशक्य (AUS vs AFG) वाटणारी गोष्ट करून दाखवली. सात वेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला पराभूत करण्याची किमया केली. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाचा (T20 World Cup) पराभव अन् तेही सुपर 8 फेरीत. ही मोठी गोष्ट असल्याने क्रिकेट विश्वात अफगाणी खेळाडूंचं कौतुक होत आहे. या विजयासाठी आणखीही पडद्यामागच्या खेळाडूंनी मोलाची कामगिरी बजावली. ऑस्ट्रेलियाचे हाडवैरीच अफगाणिस्तानच्या मदतीला धावून आले असे म्हणण्यास हरकत नाही. जोनाथन ट्रॉट (Jonathan Trott) आणि ड्वेन ब्राव्हो या (Dwayne Bravo) दोघांनी अफगाणी खेळाडूंच्या हातून ही कामगिरी करवून घेतली.

क्रिकेटच्या मैदानात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड (AUS vs ENG ) यांच्यातील वैर सर्वश्रुत आहे. अॅशेस मालिका तर दोन्ही संघासाठी नेहमीच प्रतिष्ठेची असते. मैदानातही अनेकदा खेळाडूंत शाब्दिक वाद होतात. इंग्लंडचा माजी खेळाडू जोनाथन ट्रॉट आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा वाद तर अजूनही क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात आहे. आज याच ट्रॉटने अफगाणिस्तानच्या विजयासाठी खास रणनीती आखली होती. त्याला टी 20 विशेषज्ञ ड्वेन ब्राव्होचीही साथ मिळाली.

मोठा उलटफेर! अफगाणिस्तानकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा; कमिन्सची हॅट्ट्रीकही निष्फळ

किंग्स्टनच्या खेळपट्टीवर फलंदाजी करणं सोपं नाही याची जाणीव अफगाणिस्तानच्या फलंदाजांना होती. त्यातच नाणेफेकीचा कौल ऑस्ट्रेलियाच्या बाजूने लागला. ऑस्ट्रेलियाने लगेचच गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांचा हा निर्णय यशस्वी ठरला. कांगारू संघाच्या गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी करत अफगाणी फलंदाजांना 148 वरच रोखले.

ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी चांगली आहे तेव्हा खेळपट्टीवर स्थिर होण्याचा प्रयत्न करा. विकेट देऊ नका. लहान पण उपयुक्त डावपेच खेळा असा सल्ला ट्ऱॉटने खेळाडूंना दिला होता. धावांचे आव्हान कमी होते त्यामुळे नव्या रणनितीनुसार काम करावे लागणार होते. आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचे खेळाडू जोरदार आक्रमण करतात याची माहिती ट्रॉटला होती.

ब्राव्होनेही दिल्या खास टिप्स

परंतु, याचवेळी विकेट मिळण्याचीही शक्यता जास्त असते. झालंही तसंच. सुरुवातीच्या 32 धावांत ऑस्ट्रेलियाच्या तीन विकेट पडल्या होत्या. टी 20 क्रिकेटचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या ड्वेन ब्राव्होने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना कोणत्या टप्प्यावर गोलंदाजी करायची याच्या खास टिप्स दिल्या. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना वेगवान गोलंदाजीची कोणतीच समस्या नाही. उलट ते वेगवान गोलंदाजी चांगली खेळतात. त्यामुळे अफगाणिस्तानच्या गोलंदाजांनी वाइड, यॉर्कर, स्लोअर वन, कटरवर जास्त जोर दिला.

सूर्याचं वादळ अन् बुमराहचा कहर.. टीम इंडियाकडून अफगाणिस्तानचा दणदणीत पराभव

अफगाणी गोलंदाजांचे चेंडू कसे वळतात याचा अंदाजही फलंदाजांना येत नव्हता. राशिद खानची गोलंदाजी ऑस्ट्रेलियासाठी नेहमीच परीक्षेची ठरते. फिरकीपेक्षा वेगवान गोलंदाजांना खेळपट्टी मदत करत असल्याचे लक्षात आल्यानंतर अफगाणिस्तानने रणनीती बदलली. वेगवान गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला खिंडार पाडलं. गुलबदीनने चार तर नवीन उल हकने तीन विकेट्स घेत ही रणनीती सफल ठरवली.

बलाढ्य संघांना अफगाणिस्तानने नमवलं

42 वर्षांच्या ट्रॉटने दोन वर्षांपूर्वी अफगाणिस्तानच्या प्रशिक्षकपदाची जबाबदारी स्वीकारली. तेव्हापासून त्यांनी संघातील कच्चे दुवे ओळखून संघाची बांधणी केली. मोठ्या स्पर्धात मोठे संघ, मोठे खेळाडूही दबावात येतात हे अनेकदा दिसलं आहे. पण या दबावाला कसं दूर करायचं हे ट्रॉटने अफगाणी खेळाडूंना शिकवलं. त्याचा फायदा खेळाडूंना या सामन्यात झाला. या विश्वचषकात अफगाणिस्तानने आधी न्यूझीलंड आता ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघांना पराभवाची धूळ चारली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज