David Warner Retirement: डेव्हिड वॉर्नरने केली कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, ‘या’ दिवशी खेळणार शेवटचा सामना

  • Written By: Published:
David Warner Retirement: डेव्हिड वॉर्नरने केली कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, ‘या’ दिवशी खेळणार शेवटचा सामना

David Warner Retirement:  ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरने कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. आयसीसीने अधिकृत वेबसाइटवर ही माहिती शेअर केली आहे. तो जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्ध त्याच्या कसोटी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळणार आहे. याआधी वॉर्नर अॅशेस मालिकेतील अंतिम सामना आणि जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यात जानेवारी 2024 मध्ये कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यादरम्यान वॉर्नर शेवटचा सामना खेळणार आहे.

वॉर्नर सध्या इंग्लंडमध्ये असून तो भारताविरुद्धच्या अंतिम सामन्याची तयारी करत आहे. त्यानंतर वॉर्नर 16 जूनपासून इंग्लंडविरुद्धच्या अॅशेस मालिकेचा भाग असेल. आयसीसीच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या माहितीनुसार, वॉर्नरने नुकतेच कसोटीतील निवृत्तीबाबत बोलले आहे. जानेवारी 2024 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सिडनी कसोटीदरम्यान तो निवृत्त होणार आहे. हे त्याचे घरचे मैदान आहे. याआधी ते वेस्ट इंडिजविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळू शकतात.

Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच

विशेष म्हणजे वॉर्नरची आतापर्यंतची कारकीर्द उत्कृष्ट राहिली आहे. त्याने 102 कसोटी सामन्यांमध्ये 8158 धावा केल्या आहेत. यादरम्यान वॉर्नरने 3 द्विशतकं, 25 शतकं आणि 34 अर्धशतकं झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय कसोटीत त्याची सर्वोत्तम धावसंख्या 335 धावा आहे. त्याने भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानसह अनेक मोठ्या संघांविरुद्ध चमकदार कामगिरी केली आहे.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube