Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच

  • Written By: Published:
Wrestlers Protest : विश्वविजयी ‘टीम 83’ कुस्तीपटूंच्या पाठिशी; क्रिकेटचा ‘देव’ मात्र शांतच

Wrestlers’ Protest Latest News : लौंगिक शोषणाविरोधात देशाच्या कुस्तीपटूंनी आंदोलनाचं (Wrestler Protest) हत्यार उपसलं आहे. अनेक स्तरातून या आंदोलनाला पाठिंबा दिला जात आहे. नुकतेच शेतकरी नेते राकेश टिकैतदेखील या खेडाडूंसाठी मैदानात उतरले आहे. त्यानंतर आता 1983 साली कपिल देवच्या (Kapil Deo) नेतृत्वाखाली विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाच्या खेळाडूंनी एक निवेदन जारी करत आंदोलक कुस्तीपटूंसाठी मैदानात उतरत असल्याचे सांगितले आहे. या निवेदनात माजी क्रिकेटपटूंनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवला जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. लैंगिक शोषणाविरोधात कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया आणि विनेश फोगट यांच्यासह अनेक कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंग यांच्याविरोधात निदर्शने करत आहेत. (1983 Cricket World Cup winning team issues statement on wreslers’ protest)

‘चॅम्पियन पैलवानांना अशा अवस्थेत पाहून खूप वाईट वाटले’

1983 मध्ये विश्वचषक जिंकणाऱ्या खेळाडूंनी जारी केलेल्या निवेदनात देशाच्या चॅम्पियन कुस्तीपटूंना अशा स्थितीत पाहणे अत्यंत वाईट असल्याचे नमुद केले आहे. विशेषत: पैलवान आपली पदके गंगेत फेकणार आहेत, याची आम्हाला सर्वाधिक चिंता वाटत असल्याचे  म्हणत ही अत्यंत खेदाची गोष्ट असल्याचे या दिग्गज खेळाडूंनी म्हटले आहे. कुस्तीपटूंना ही पदकं सहजासहजी मिळालेली नाही, त्यासाठी त्यांनी वर्षानुवर्षे त्याग आणि समर्पण दाखवले आहेत. घाईत निर्णय घेऊ नका. आम्ही आशा करतो की तुमची तक्रार ऐकून घेतली जाईल आणि त्यावर लवकरात लवकर तोडगा निघेल असा विश्वास या खेळाडूंनी आंदोलक खेळाडूंना दिला आहे. या निवदनावर कपिल देव, सुनील गावस्कर, दिलीप वेंगसकर यांच्यासह संपूर्ण टीम सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Gautami Patil : छोट्या पुढाऱ्याशी होणार गौतमीचा सामना; फेस-टू-फेस बसून करणार लावणीवर चर्चा

आंदोलनावर सचिनची चुप्पी

दरम्यान, एकीकडे कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी 1983 साली भारताला विश्वचषक मिळवून देणारा संघ मैदानात उतरला आहे. तर, दुसरीकडे क्रिकेटचा देव म्हणून सर्वांना परिचित असणारा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरने मात्र, अद्यापपर्यंत या प्रकरणावर नाही पाठिंबा दिला आहे किंवा भाष्य केले नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सचिनच्या या भूमिकेमुळे अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत. तर, मुंबईतील काही भागांमध्ये कुस्तीपटूंच्या आंदोलनावर सचिन मूग गिळून गप्प का? अशा सवाल करणारे पोस्टर मुंबई युवक काँग्रेसतर्फे लावण्यात आले होते.

https://letsupp.com/maharashtra/shivrajyabhishek-din-sohala-on-raigad-fort-in-the-presence-of-narendra-modi-ek-eknath-shinde-53293.html

ब्रिजभूषण विरुद्ध दोन एफआयआर

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी 2 FIR नोंदवले आहेत. यात एक एफआयआर प्रौढ कुस्तीपटूंच्या तक्रारीवरून तर, दुसरी एफआयआर अल्पवयीन कुस्तीपटूच्या तक्रारीवरून नोंदवण्यात आली आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube