अफगाणिस्तानने बांग्लादेशला लोळवलं, सेमी फायनलमध्ये धडक; ऑस्ट्रेलियाचं पॅकअप

अफगाणिस्तानने बांग्लादेशला लोळवलं, सेमी फायनलमध्ये धडक; ऑस्ट्रेलियाचं पॅकअप

Afghanistan beat Bangladesh : टी 20 विश्वचषकाच्या सुपर 8 फेरीतील अत्यंत थरारक (AFG vs BAN) सामन्यात अफगाणिस्तानने पुन्हा मोठा उलटफेर केला. धावा कमी असताना गोलंदाजी अन् चिवट खेळाच्या बळावर अफगाणिस्तानच्या खेळाडूंना अनुभवी बांग्लादेशला लोळवलं. या विजयानंतर अफगाणिस्तानने (Afghanistan) सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला. मात्र, बांग्लादेशच्या पराभवाचा सर्वात मोठा (Bangladesh) धक्का बसला तो ऑस्ट्रेलियाला. बांग्लादेश विजयी झाला असता तरच ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलचं (Australia) तिकीट मिळालं असतं. मात्र, हा चमत्कार घडलाच नाही अन गतवेळच्या चॅम्पियन ऑस्ट्रेलियावर स्पर्धेतून बाहेर पडण्याची नामुष्की ओढवली.

टीम इंडियाचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक

अफगाणिस्तान आणि ऑस्ट्रेलिया या दोन्हींसाठी हा सामना अतिशय महत्वाचा होता. बांग्लादेश आधीच स्पर्धेबाहेर पडला होता. परंतु, या सामन्यात बांग्लादेश विजयी झाला असता तर ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये पोहोचला असता. परंतु, असं घडलं नाही. अफगाणिस्तानच्या खेळाडूंनी शानदार खेळ करत बांग्लादेशच्या हातातून सामना खेचून घेतला. या विजयासह अफगाणिस्तानने सेमी फायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे. त्यांचा या विजयाने ऑस्ट्रेलियाला मात्र स्पर्धेबाहेर केले आहे. आता सेमी फायनलचं चित्रही स्पष्ट झालं आहे. सेमी फायनलमध्ये भारत, दक्षिण आफ्रिका, इंग्लंड आणि अफगाणिस्तान या चार संघांनी एन्ट्री घेतली आहे.

या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानने फक्त 115 धावा केल्या होत्या. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना विशेष काही करता आले नाही. त्यामुळे अफगाणिस्तानच्या चाहत्यांची धाकधूक वाढली होती. बांग्लादेशकडे अनुभवी फलंदाज आहेत त्यामुळे ते हा सामना सहज जिंकतील असे वाटत होते. परंतु, मधल्या ओव्हर्समध्ये अफगाणी गोलंदाजांनी धारदार गोलंदाजी केली. एकामागोमाग एक विकेट घेतल्या. त्यामुळे सुरुवातीला वेगात धावा केलेल्या असतानाही बांग्लादेशचे फलंदाज दडपणात आले.

पराभव बांगलादेशचा पण, धक्का इंग्लंडला; डीफेंडींग चॅम्पियनचं जुनं रेकॉर्ड कांगारूंनी मोडलं 

सलामीवर फलंदाज लिटन दास शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून होता. धावाही करत होता. मात्र त्याला अन्य फलंदाजांची साथ मिळाली नाही. शेवटच्या काही ओव्हर्समध्ये पाऊस सुरू झाला त्यामुळे काही काळ सामना थांबवावा लागला होता. डकवर्थ लुईस नियमानुसार अफगाणिस्तानने दिलेल्या टार्गेटमध्ये एक रन कमी करण्यात आला. सामना सुरू झाला त्यावेळी दोन्ही संघांच्या खेळाडूंवर दडपण स्पष्ट दिसत होते. यानंतर बांग्लादेशच्या लागोपाठ दोन विकेट पडल्याने अफगाणिस्तानने सामन्यात जोरदार  कमबॅक केले.

अफगाणिस्तानचा कर्णधार राशिद खानने चार विकेट घेतल्या. फलंदाजीतही शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने मोठे शॉट्स मारले. त्यामुळे अफगाणिस्तानला 115 धावा करता आल्या. गुरबाजनेही 43 धावा करत त्याला चांगली साथ दिली. बांग्लादेशकडून एकट्या लिटन दासने सर्वाधिक 54 धावा केल्या. सौम्य सरकार आणि तोहिद हृदयोय यांनी महत्वाची भागीदारी केली. बांग्लादेशने पकड घेतली असे वाटत असतानाच राशिद खानने सौम्या सरकार, तोहिद आणि आणखी एक फलंदाजाा बाद करत बांग्लादेशची अवस्था 6 बाद 80 अशी केली. दुसरीकडे लिटन दासने अर्धशतक पूर्ण केले. परंतु, त्याच्या अर्धशतकानेही  बांग्लादेशला विजयी केलं नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube