टीम इंडियाचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक

टीम इंडियाचा पराक्रम! ऑस्ट्रेलियाचा दणदणीत पराभव करत सेमी फायनलमध्ये धडक

IND vs AUS : टी 20 विश्वचषकाच्या थरारक सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलिया संघाचा (IND vs AUS) दणदणीत पराभव केला. या विजयासह भारताने मागील वर्षातील (T20 World Cup) वर्ल्डकपमधील पराभवाचा वचपा देखील काढला. या सामन्यात जितका चांगला खेळ फलंदाजांनी केला तितकाच दमदार खेळ गोलंदाजांनी देखील केला. या पराभवामुळे ऑस्ट्रेलियाच्या (Australia) सेमी फायनलमध्ये पोहोचण्याच्या स्वप्नांना जोरदार धक्का बसला आहे. सोमवारी झालेल्या या सामन्यात टीम इंडियाने 24 धावांनी ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. या विजयासह भारताने सेमी फायनलमध्ये आपली जागा पक्की केली आहे.

भारताने दिलेल्या आव्हानाचा ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी चांगला पाठलाग केला. मात्र शेवटच्या काही ओव्हर्समध्ये भारताने विकेट घेत जोरदार वापसी केली. अर्शदीप सिंह (Arshadeep Singh) आणि जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि कुलदीप यादव (Kuldeep Yadav) यांनी जबरदस्त गोलंदाजी करत कांगारूंच्या फलंदाजांना चांगलेच हैराण केले.

मोठा उलटफेर! अफगाणिस्तानकडून ऑस्ट्रेलियाचा धुव्वा; कमिन्सची हॅट्ट्रीकही निष्फळ

नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारताच्या फलंदाजांनी धडाकेबाज सुरुवात केली. कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) तर ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांच्या चिंधड्या उडवल्या. चौकार, षटकारांची आतषबाजी करत 94 धावा केल्या. त्याच्या या तुफानी खेळीच्या जोरावर भारताने 205 धावांचे आव्हान दिले. या सामन्यात विराट कोहली शून्यावर (Virat Kohli) बाद झाला.

ऑस्ट्रेलियानेही या आव्हानाचा पाठलाग करताना वेगाने फलंदाजी केली. परंतु, ठराविक अंतराने विकेट पडत गेल्या. त्यामुळे 20 ओवर्समध्ये फक्त 181 रन करता आले. पहिल्याच ओव्हरमध्ये विकेट पडली. अर्शदीप सिंगने डेव्हिड वॉर्नरला (David Warner) बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. दुसऱ्या बाजूने हेडने (Travis Head) जोरदार फलंदाजी सुरूच ठेवली होती. यानंतर आलेल्या मिचेल मार्शने देखील (Mitchel Marsh) वेगाने रन बनवायला सुरुवात केली. अर्धशतकाच्या जवळ आलेला असतानाच कुलदीप यादवने मार्शला बाद करत दुसरी विकेट मिळवून दिली.

मार्श बाद झाल्यानंतरही हेड वेगाने धावा करतच होता. त्याला मॅक्सवेलची साथ मिळाली. मॅक्सवेलने काही (Glenn Maxwell) फटके मारले. पण कुलदीपने लवकरच त्याला तंबूत धाडले. मॅक्सवेलने 12 चेंडूत 19 रन केले. यानंतर मार्कस स्टोईनिस विशेष काही करू शकला नाही. अक्षर पटेलच्या फिरकी (Axar Patel) गोलंदाजीवर तो बाद झाला.

विंडीजचा कहर! अमेरिकेवर दणदणीत विजय; होपसमोर गोलंदाजांची शरणागती

गोलंदाजांनी विकेट घेत ऑस्ट्रेलियाच्या धावांवर नियंत्रण मिळवले होते. परंतु दुसऱ्या बाजूने हेड चौकार षटकारांच्या मदतीने धावा करतच होता. हेडला बाद करण्यासाठी रोहितने बुमराहला गोलंदाजी (Jasprit Bumrah) दिली. सतराव्या ओव्हरमध्ये बुमराहच्या चेंडूवर रोहित शर्माकडे कॅच देत हेड बाद झाला. हेडने 43 चेंडूत 76 धावांची विस्फोटक खेळी केली.

या पराभवामुळे आता ऑस्ट्रेलियाला सेमी फायनलमध्ये पोहोचणे खूप कठीण झाले आहे. याआधीच्या सामन्यात अफगाणिस्तानने सुद्धा ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. यानंतर आता अफगाणिस्तानला बांगलादेश विरुद्ध  (AFG vs BAN) खेळायचे आहे. या सामन्यात जर अफगाणिस्तान जिंकला तर ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये पोहोचणार नाही.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज