अमेरिकेचा पराभव करत टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक; सूर्यकुमार, अर्शदीप चमकले

अमेरिकेचा पराभव करत टीम इंडियाची सुपर 8 मध्ये धडक; सूर्यकुमार, अर्शदीप चमकले

T20 World Cup 2024 IND vs USA : टी 20 विश्वचषकात टीम इंडियाची विजयी घोडदौड (T20 World Cup 2024) कायम आहे. काल झालेल्या सामन्यात भारताने अमेरिकेचा पराभव करत (IND vs USA) सुपर 8 फेरीत दिमाखात प्रवेश केला. भारतीय संघाने आतापर्यंत तिन्ही सामने जिंकले आहेत. आता सुपर 8 फेरीत (Team India) बलाढ्य संघांशी दोन हात करावे लागणार आहेत. काल झालेल्या सामन्यात नवख्या अमेरिकेच्या संघाने भारताला 111 धावांचे माफक आव्हान दिले होते. भारताने हे लक्ष्य सहज गाठत पुढील फेरीत प्रवेश निश्चित केला.

फलंदाजीत विराट कोहली आणि रोहित शर्मा दोघेही अपयशी ठरले. यानंतर रिषभ पंत, सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे यांनी चमकदार खेळ करत अमेरिकेला पराभूत केले. सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांनी 67 धावांची विजयी भागीदारी केली.

अमेरिकेने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. विराट कोहली तर शून्यावरच बाद झाला. कर्णधार रोहित शर्माही फक्त तीन रन काढून तंबूत परतला. त्याला अमेरिकेच्या सौरभ नेत्रावळकरने माघारी पाठवल. यानंतर सूर्यकुमार यादव आणि रिषभ पंत यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. परंतु, 18 धावांवर खेळत असताना पंत बाद झाला. यानंतर सूर्यकुमार यादव आणि शिवम दुबे या दोघांनी खिंड लढवली.

विश्वचषकात मोठा उलटफेर! अफगाणिस्तानचा न्युझीलंडला धक्का; एकतर्फी सामना जिंकला

यादव 22 धावांवर असताना त्याचा झेल सुटला. यानंतर मात्र त्याने जोरदार आक्रमण सुरू केले. कॅच सुटल्यानंतर सामना अमेरिकेच्या हातून पूर्णपणे निसटला. पुढे 30 चेंडूत 35 धावांची गरज होती. सोळावी ओव्हर टाकताना अमेरिकेने जास्त वेळ घेतला त्याची शिक्षा म्हणून 5 पेनल्टी धावा भारताला अनायासे मिळाल्या. यानंतर 30 चेंडूत 30 धावा असे लक्ष्य होते. सूर्यकुमार आणि शिवम दोघांनी संयमी खेळी केली आणि भारतीय संघाला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. सूर्यकुमारने अर्धशतक पूर्ण केले तर शिवमने 31 धावा केल्या.

याआधी गोलंदाजीतही भारतीय गोलंदाजांनी कमाल केली. अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीसमोर अमेरिकन फलंदाज ढेपाळले. अर्शदीपने चार ओव्हर्समध्ये फक्त 9 धावा देत 4 विकेट्स घेतल्या. त्यानंतर हार्दिक पांड्या, अक्षर पटेल यांनीही चांगला मारा केला. त्यामुळे अमेरिकेला कशीतरी 110 धावांपर्यंत मजल मारता आली. अमेरिकेकडून स्टिव्हन टेलर 24, नितीश कुमार 27, कोरी अँडरसन 15 आणि अरोन जोन्सने 11 रन केले.

भारताची विजयी सलामी! पहिल्याच सामन्यात आयर्लंडवर एकतर्फी विजय

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज